घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत ठेकेदाराच्या "माऊली"चा हेकेखोरपणा परंतु कामगारांची सकारात्मक भूमिका. लोकनियुक्त अध्यक्षांनी गेल्या वर्षभरातील कामाची चौकशी व प्रत्यक्ष खात्री करून बिल अदा करावे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील मजुरांना वेळेवर मजुरी मिळत नसल्याने तीव्र नाराजी.

यावल दि.२२
बुधवार दि.२३ सप्टेंबर २०२६ पासून ६० ते ७० मजुरांनी पगार वेळवर मिळत नसल्याने काम बंद आंदोलनाचा दिला होता इशारा.

परंतु यावल शहरातील नागरिकांच्या घराघरातील ओला व सुका घनकचरा संकलन होणार नसल्याने पर्यायी जनता वेठीस धरली जाईल म्हणून तसेच लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांनी मजुरांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत सकारात्मक भूमिका दाखविल्याने मजूर वर्ग घनकचरा संकलनाचे काम सुरू ठेवणार आहेत.

ठेकेदाराने नियुक्त केलेल्या माऊली नामक मॅनेजरने गेल्या वर्ष दोन वर्षाच्या कालावधीत घनकचरा संकलन टेंडर मधील अटी शर्तीनुसार ७५ टक्के काम न केल्याने लोकनियुक्त नगराध्यक्षांनी सर्व कामांची खात्री करून चौकशी केल्यास फार मोठे प्रकरण समोर आल्याशिवाय राहणार नाही.
चौकशी केल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करू नये अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

ठेकेदाराचा माऊली नामक बेकायदा मॅनेजर घनकचरा प्रकल्पातील मजुरांना विश्वासात न घेता हेकेखोरपणाची वागणूक मजुरांना देऊन सोयीनुसार कमी मजुरी येत असल्याने मजूर वर्गात तीव्र संतप्त भावना व्यक्त करीत आहे.

येत्या आठ पंधरा दिवसात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा नवीन ठेका ठेकेदाराला दिला जाणार असल्याने माऊली नामक मॅनेजर सुरू असलेल्या ठेकेदारातील मजुरांना नियमानुसार पूर्ण मजुरी देणार किंवा नाही.? याबाबत मजुरांमध्ये संशय व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात