मालोद सरपंच यांच्या पतीकडून ग्रा.पं.अधिकाऱ्यास शिवीगाळ,दमदाटी. पोलीस निरीक्षक,गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

यावल दि.२४ 
तालुक्यातील मालोद ग्रामपंचायत सरपंच यांचे पती भारसिंग बारेला यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार ग्राम.अधिकारी विजय गंगाराम बारेला यांनी पोलीस निरीक्षक यावल आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे दिली. 

यावल पोलीस निरीक्षक आणि पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे दि.२४ मार्च २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात विजय बारेला यांनी नमूद केले आहे की मी ग्रा.पं.कार्यालय मालोद येथे चार्ज हस्तांतरणासाठी गेलो असता त्या ठिकाणी सरपंच यांचे पती भारसिंग बारेला हे सुध्दा कार्यलयात आलेले होते.मी मागील ग्रा.प.अधिकारी विजय नारायण साळंके यांना त्यांनी मला चार्ज दिल्याप्रमाणे मी त्यांना परत चार्ज देत होतो.त्यावेळी सरपंच यांचे पती भारसिंग बारेला यांनी मला कोणतेही कारण न देता यापुढे ग्रा.पं.मालोद येथे किंवा वाघझिरा येथे आल्यास तुला पाहुन घेईल अशी धमकी देत माझ्या आईला उद्देशून शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.त्यावेळी ग्रा.पं.कार्यालयात शिपाई कुर्बान तडवी,रोजगार सेवक मेहरबान तडवी ग्रा.पं.सदस्य सुदरसिंग बारेला,सलीम तडवी भिका तडवी, नजमा तडवीचे पती पा.पु.शिपाई आमद तडवी व ग्राम पं.अधिकारी विजय साळूंखे हे सर्व उपस्थित होते.तसेच यापुर्वी सुध्दामला भारसिंग बारेला यांनी अनेकवेळा शासकीय कामात अडथळा निर्माण करुन त्रास दिलेला आहे.व ग्रा.प.येथील कामही करु देत नाही.तसेच ग्रा.पं.ची सर्व कामकाज ते सांगतील त्याप्रमाणे करायला लावतात.व सरपंचांचीही सर्व कामे तेच पाहत असतात.तसेच सुरवातीपासून त्यांनी मला ग्रा.पं. मध्ये हजर न होवू देण्याबाबत काही ग्रा.पं.सदस्यांना सोबत घेवून माझ्यावर अनेक तक्रारी आपल्या कडे व ग्रा.पं.
विभाग,जि.प.जळगांव येथे केलेल्या आहेत. तसेच मी नविन असल्यामुळे त्यानी मला काहीन काही त्रास देवून शासकीय कामात अडथळे निर्माण करतच राहतात तसेच माझे प्रशिक्षण कालावधीही वाढविण्यात आलेला असून प्रशिक्षणासाठी आपण मालोद याच ग्रा.पं.येथे आदेशित केलेले आहे.परंतू त्यांच्या अशा वारंवार त्रासामुळे मला या ठिकाणी प्रशिक्षण व कामकाजकरणे अवघड झालेले आहे.तरी माझी प्रतिनियुक्ती किंवा बदली इतर ग्रा.पं.मध्ये करण्यात यावी अशी विनंती तक्रारदार ग्राम पंचायत अधिकारी विजय बारेला यांनी करून तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद जळगांव,उप मुख्य कार्यकारी अधिकारी,ग्रा.पं. विभाग,विस्तार अधिकारी, पंचायत समिती यावल यांना माहितीसाठी व कार्यवाहीसाठी सादर केली. पुढील कार्यवाही काय होते याकडे मालोद ग्रामपंचायतसह किनगाव परिसराचे लक्ष लागून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात