यावल दि.८
केंद्रीय युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत, जळगावच्या मार्गदर्शनाखाली समृद्धजन फाउंडेशनचे संस्थापक कमलेश सोनवणे यांनी यावल तालुक्यात सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्रीक्षेत्र मनुदेवी माता मंदिर येथे स्वच्छता अभियान राबविले.
स्वच्छता पखवाडाच्या अंतर्गत गेल्या पंधरा दिवसांपासून विविध ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.कचरा संकलन,झाडलोट,
जनजागृती करत श्री क्षेत्र मनुदेवी मंदिर परिसरात हे अभियान राबविण्यात आले.फाऊंडेशन, राष्ट्रीय सेवा योजना व मायभारतच्या एकूण पंधरा स्वयंसेवकांनी ह्या अभियानात उस्फुर्त सहभाग नोंदविला.मंदिर परिसर,पायऱ्या,पार्किंग क्षेत्र, जलस्रोत अशा विविध भागांतील कचरा संकलन करत परिसर चकाचक करण्यात आला. याप्रसंगी तेथील भक्तमंडळी व नागरिकांस स्वच्छतेबाबतची जागृती देखील स्वयं सेवकांनी केली.संपूर्ण परिसर स्वयंसेवकांच्या 'भारत माता की जय' व 'स्वच्छ भारत' ह्या घोषणांनी दुमदुमला मंदिर प्रशासनाचे विश्वस्त व कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवकांच्या ह्या उस्फुर्त कामगिरीचे कौतुक केले.



टिप्पणी पोस्ट करा