सुरक्षा रक्षकांच्या बदल्यांसाठी गौतम सोनवणे यांचे पत्र. तापी पाटबंधारे विकास महामंडळातील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मागणीला पाठबळ.

यावल दि. ३ – तापी पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत जळगाव शहरात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सुरक्षा रक्षक गौतम राम सोनवणे यांनी आपल्या बदलीसंदर्भात मागणी केली असून,त्यांच्या मागणीला गौतम रा.सोनवणे यांनी पाठिंबा देत संबंधित विभागाकडे पत्राद्वारे विनंती केली आहे.

पत्रात नमूद केल्यानुसार, जळगाव शहरातील सुरक्षा मंडळामार्फत नियुक्त करण्यात आलेले काही सुरक्षा रक्षक २४-२४ तास काम करीत असून, खासगी काम देखील करीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.तसेच शासनाच्या नियमानुसार सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतात.मात्र तापी पाटबंधारे विकास महामंडळात जळगाव शहरात कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांच्या बदल्यांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

जळगाव शहरात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले सर्व सुरक्षा कर्मचारी आपल्या आस्थापनेवर आहेत.त्यामुळे शासनाच्या नियमानुसार त्यांची बदली करण्यात यावी,अशी विनंती गौतम सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे.
या पत्राच्या प्रती तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक,जळगावचे जिल्हाधिकारी तसेच मुख्य अभियंता यांच्याकडे माहिती व योग्य कार्यवाहीसाठी सादर करण्यात आल्या आहेत.
-------------------------------------------------
नियमाप्रमाणे बदली होणार का?
सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत शासनाच्या नियमांचा आधार घेत आमदारांनीच विभागाकडे पाठपुरावा केल्याने आता तापी पाटबंधारे विकास महामंडळ प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेते, याकडे सुरक्षा कर्मचाऱ्यांसह संबंधितांचे लक्ष लागले आहे.
-------------------------------------------------

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात