यावलच्या लोकप्रिय नेतृत्वाचा साधेपणाचा आदर्श - वाढदिवसावर प्रसिद्धी टाळण्याचे आवाहन.

यावल दि.१०
यावल नगर परिषदेचे गाढे अभ्यासक,आपल्या प्रभावी वक्तृत्व शैलीमुळे राजकारणात आणि समाजकारणात सकारात्मक ठसा उमटवणारे,तसेच नगरपालिका क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नेहमीच प्राधान्य देणारे माजी नगराध्यक्ष तथा उबाठाचे ( शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ) विद्यमान नगरसेवक मा.अतुलभाऊ पाटील यांचा वाढदिवस शनिवार दि.१२ सप्टेंबर २०२६ रोजी आहे.

दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात मोठा उत्साह असतो,कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी बॅनरबाजी,शुभेच्छा फलक लावले जातात.मात्र यंदा अतुलभाऊंनी एक वेगळा आणि संवेदनशील आदर्श घालून दिला आहे.निसर्गाच्या संकटात शेतकऱ्यांसोबत - साधेपणाने वाढदिवस साजरा करणार यावर्षी निसर्गाच्या अनियमितपणामुळे आणि अत्यल्प पाऊस झाल्यामुळे बळीराजा,नागरिक,
व्यापारी वर्ग आणि सर्वच व्यावसायिक चिंताग्रस्त आहेत.शेतातील पिके पाण्याअभावी संकटात आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन मा. अतुलभाऊ पाटील यांनी आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने,
घरीच घरगुती वातावरणात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणताही मोठा सत्कार समारंभ, केक कापण्याचा कार्यक्रम किंवा जंगी मिरवणूक न काढता हा दिवस कुटुंबीयांसोबत साधेपणाने साजरा होणार आहे.
कार्यकर्त्यांना कळकळीचे आवाहन - "जाहिरातबाजीवर खर्च करू नका" यासोबतच त्यांनी आपले सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक आणि मित्रमंडळींना जाहीर आवाहन केले आहे की, "सध्याची परिस्थिती बिकट आहे.माझ्या वाढदिवसानिमित्त कोणीही महागडे फ्लेक्स,बॅनर लावून, पेपरमध्ये जाहिराती देऊन प्रसिद्धीवर अनावश्यक खर्च करू नये.आपले प्रेम आणि शुभेच्छा हेच माझ्यासाठी सर्वात मोठे बळ आहे.तो पैसा गरजूंसाठी किंवा सामाजिक कामासाठी वापरला तर मला अधिक आनंद होईल."
अतुल भाऊंच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. संकटाच्या काळात स्वतःच्या आनंदापेक्षा जनतेच्या दुःखाचा विचार करणारा नेता हीच त्यांची ओळख आहे, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

जनतेच्या सुख-दुःखात सदैव सहभागी होणारे,सामाजिक कार्याची नाळ जपणारे आणि विकासासाठी सदैव तत्पर असणारे आपल्या सर्वांचे लाडके, विश्वासू व लोकप्रिय मा.अतुल भाऊ पाटील यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा !
त्यांच्या नेतृत्वातून समाजसेवेचे कार्य असेच अविरत सुरू राहो, त्यांच्या प्रत्येक संकल्पाला यश मिळो आणि त्यांच्या आयुष्यात सुख,समृद्धी,उत्तम आरोग्य व यश सदैव नांदो,हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

सुरेश पाटील.
साप्ताहिक व्यासनगरी न्युज 
संपादक तथा दैनिक साईमत यावल तालुका प्रतिनिधी.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात