यावल दि. ८
येथील पोलीस स्टेशनच्या आवारात सध्या बांधकामासाठी वापरली जाणारी एक आसारी वाहतूक करणारे वाहन जप्त करून लावण्यात आले असून, या प्रकरणावरून संपूर्ण यावल शहरातील बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदारांच्या वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.फिर्यादी आणि आरोपीच्या या पेचप्रसंगात कायद्यानुसार रीतसर पक्का गुन्हा कधी अन् कोणावर दाखल होतो.? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
मुद्देमालाचे गूढ अन् संशयाची सुई पोलीस ठाण्याच्या आवारात उभी असलेली ही हजारो रुपये किमतीची आसारी नेमकी कोणी आणि कुठून खरेदी केली ? आसारी खरेदीचे पक्के बिल अथवा जीएसटी (GST) आकारणीची पावती वाहनचालकाकडे किंवा मालकाकडे उपलब्ध आहे का ? हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे. प्राथमिक माहितीनुसार,या आसारीची परस्पर कोणत्या मार्गाने विल्हेवाट लावण्याची तयारी सुरू होती,याचाही शोध पोलीस तपासात घेणे गरजेचे बनले आहे.
चालकाचा आणि वाहनाचा परवाना अन् कायद्याचा बडगा सदर आसारीची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स (परवाना) आहे की नाही.? गाडीची कागदपत्रे मुदतीत आहे किंवा नाही.? ही बाबही गुन्हा दाखल करताना समोर येणार आहे.जर विनापरवाना किंवा गैरकायदेशीररीत्या ही वाहतूक सुरू असेल,तर संबंधित चालक आणि मालक दोघेही कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.आर्थिक झळ कोणाला ? ठेकेदार वर्तुळात चर्चांना उधाण.
तपास अंती या प्रकरणात नेमका कोणावर गुन्हा नोंदवला जातो आणि या कायदेशीर कारवाईची सर्वात मोठी आर्थिक झळ कोणाला सोसावी लागते, याबद्दल यावल नगरपरिषद परिसर,बांधकाम व्यावसायिक आणि स्थानिक ठेकेदारांमध्ये तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
सध्या हे वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात जमा असले तरीही पोलिसांची चौकशी आणि सखोल तपास पूर्ण झाल्यावरच या संपूर्ण प्रकरणाचा खरा 'आराखडा' स्पष्ट होणार आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते आणि गुन्हा केव्हा दाखल होतो.? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.



टिप्पणी पोस्ट करा