बाल संस्कार विद्या मंदिरात आनंद बाजारचे आयोजन.

यावल दि.१७ 
पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, व्यवस्थापन कौशल्य आणि उद्योजकतेचे धडे मिळावेत या उद्देशाने,येथील बाल संस्कार विद्या मंदिर व माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवाचे औचित्य साधून ‘आनंद बाजारा’चे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात ६५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारले आणि आपल्यातील व्यावसायिक कौशल्याची झलक दाखवून दिली.
कार्यक्रमाचे उद्घाटन यावलच्या नगराध्यक्षा सौ.छाया अतुल पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अतुल पाटील तसेच ज्योती वाणी उपस्थित होत्या.

व्यवहारज्ञान आणि उपक्रमशीलतेला प्रोत्साहन
आजच्या आधुनिक शैक्षणिक धोरणात (NEP) 'कृतीतून शिक्षण' (Experiential Learning) आणि 'उद्योजकता विकास' (Entrepreneurship Development) यावर विशेष भर दिला जात आहे.याच मालिकेतील एक भाग म्हणून या आनंद बाजारात मुलांनी केवळ पदार्थ विकले नाहीत, तर
किंमत निश्चिती व हिशोब: पदार्थांचा निर्मिती खर्च,विक्री किंमत आणि नफा-तोटा यांचा प्रत्यक्ष हिशोब मांडणे शिकले.
ग्राहक संवाद व विपणन (Marketing): ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी संवाद कौशल्य आणि प्रभावी सादरीकरणाचा सराव केला.
संघभावना व व्यवस्थापन: स्टॉलची सजावट, स्वच्छता आणि नियोजनातून संघभावना आणि नेतृत्वगुणांचा विकास दिसून आला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना नगराध्यक्षा छाया पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या बालउद्योजकतेचे भरभरून कौतुक केले.अशा उपक्रमांमुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातील व्यावसायिक आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते,असा विश्वास पाहुण्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष महेश वाणी,बाल संस्कार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक अतुल गर्गे,माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील माळी यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळा प्रशासनाने राबवलेल्या या शैक्षणिक व उपक्रमशील आयोजनाचे पालकांकडून व नागरिक स्तरावरून विशेष कौतुक होत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात