भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या ट्राफिक पोलिसांचा धुमाकूळ.. जबरदस्तीने वाहन थांबवुन पैसे उकाळण्याचा धंदा सुरु असल्याची जनतेमध्ये जोरदार चर्चा ..



दि.७ मुख्य क्राईम रिपोर्टर जळगाव जिल्हा. 
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात असलेले बाजारपेठ पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलिस कर्मचारी यांनी काही दिवसांपासुन वाहनधारकांना जबरदस्तीने अडवून वाहनांकडुन पैसे उकाडण्याची चर्चा हळूहळू जळगाव जिल्ह्यात वाऱ्या सारखी पसरू लागली आहे.. याबाबत अधिक माहिती अशी भुसावळ शहर हे मध्यवर्ती ठिकाण तसेच भारतातील सर्वात मोठे रेल्वे जंक्शन असल्याने या भागात वाहनांची नेहमी वर्दळ असते..कोणी व्यक्ती दवाखान्यात कामानिमित्त इमरजंसी कामानिमित्त भुसावळ ला येजा करीत असतात यामुळे भुसावळ शहरात वाहनांची वर्दळ असते परंतु काही दिवसांपासून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन चे काही ट्राफीक पोलीस हे जनतेचे रक्षक नसुन पैशांचे भक्षक झाले की काय? असे जळगाव जिल्ह्याच्या जनतेकडून ऐकवण्यास मिळत आहे.तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी परिस्थिती असल्याने कारणाने संबंधित पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे जनतेकडुन बोलले जात आहे.तसेच इतर वाहनांप्रमाणे आता चारचाकी वाहनांना देखील गाडी थांबवून जनतेचा वेळ वाया घालवत असल्याचे चित्र आहे.त्याचबरोबर फैजपूर येथील पत्रकार इरफान शेख हे भुसावळ ला जरुरी कामानिमित्त जात असल्याने यांना देखील महिला ट्राफिक पोलीस यांनी आपली खाकी वर्दी ची पावर दाखवली आम्ही पत्रकारांना घाबरत नाही आणि तुमच्या गाडीवरच पत्रकार PRESS नाव काढुन टाका नाहीतर आम्ही काढून टाकु अशी इरफान शेख पत्रकार यांना धमकी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.. जर लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ असलेल्या पत्रकारितेला भुसावळ बाजारपेठ पोलीसांचा विरोध आहे की जाणुन बुजुन पत्रकारांना त्रास देणे भुसावळच्या ट्राफिक पोलीसांनी ठरवले आहे की काय? अशी चर्चा सध्या स्थितीत पत्रकार आणि परिसरातील जनतेमध्ये जोर धरत आहे..

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात