आडजात जळाऊ लाकडाचे अवैध वाहतूक करणारे वाहन यावल येथील पश्चिम वन विभागाने पकडले. ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त.

यावल दि.८ 
यावल पश्चिम वनक्षेत्रपाल प्रशांत जोशी यांच्या कार्यक्षेत्रातील हरिपुरा - जामण्या राऊंड स्टॉप पथकाने दि.७ सप्टेंबर २०२६ रोजी गुप्तबातमीवरून 
आडजात जळाऊ लाकडाची अवैध वाहतूक करणारे पिकअप वाहन पकडून त्या वाहन आणि जळावू लाकडासह ३ लाख ६० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केल्याने पश्चिम वन क्षेत्रातून अवैध लाकडाची वाहतूक करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली.

याबाबत सविस्तर माहिती अशी यावल येथील पश्चिम वन क्षेत्रातील राऊंड स्टाफ हरिपुरा व जामण्यासह वड्री धरण ते वड्री रस्त्याने गस्त करीत असतांना अवैध वाहतूक करणारी पीकअप Max संशयित आढळून आल्याने सदर गाडी चौकशी कामी थांबवली असता वाहन चालक गाडी सोडून पसार झाला सदर वाहन महिला १९, S - ४६९६ व मुद्देमाल आडजात जळाऊ घ.मी. ०६ गाडी व मुद्देमाल एकूण किंमत- 3.60.008 किंमतीचा जप्त मुद्देमाल मु.वि.केंद्र यावल येथे पावतीने जमा केला,सदर वनगुन्हा बाबत व.र.हरिपुरा पूर्व यांनी प्र.री.क्र.५ / २०२६ दि. ७ सप्टेंबर २०२६ चा जारी केला.
पुढील तपास वनपाल हरिपुरा एस.बी. इंडे. करीत आहे.
सदरची कारवाई सौरिष सहाय उपवनसंरक्षक यावल वनविभाग जळगाव,एस.ए.पाटील सहाय्यक वनसंरक्षक यावल प्रा.व कॅम्पा वनक्षेत्रपाल पी.डी.
जोशी सर यावल पश्चिम यांच्या मार्गदर्शना खाली डी.ए.परदेशी वनपाल जामन्या,श्रीमती एस.एस.भोंगरे वनरक्षक हरिपुरा पूर्व,श्रीमती एस.पी.भालेराव वनरक्षक हरिपुरा एस.बी.पाटणे वनरक्षक,दीपक चव्हाण वनरक्षक,राजेश बारेला वनरक्षक व राजू तडवी,वनसेवक,शकील तडवी वनसेवक यांनी केली.
        सदरची कारवाई पश्चिम क्षेत्रात झाली त्याप्रमाणे पूर्व वन क्षेत्रात कार्यालयापासून काही अंतरावरूनच अवैध लाकडाची सर्रासपणे वाहतूक सुरू आहे. पूर्व वनक्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी काय तपासणी करतात.? आणि यांचे गुप्त खबरी आहेत किंवा नाही.? असे प्रश्न उपस्थित होत असून पूर्व वनक्षेत्रपाल यांनी केलेल्या कारवायाबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात