कचरा संकलनाच्या वाहनांची दुरवस्थ ; यावल नगरपरिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ?

यावल दि. ४ 
यावल शहरातील ओला व सुका घनकचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापनाकडून कचरा वाहतूक करणाऱ्या पाच वाहनांच्या देखभाल-दुरुस्तीबाबत गंभीर आरोप होत आहेत. वाहनांमध्ये हलक्या दर्जाचे स्पेअर पार्ट व बॅटरी बसविणे, स्टेफनी-जॅकसह साहित्याची विल्हेवाट लावणे तसेच काही कामांचे पेमेंट प्रलंबित असल्याच्या तक्रारींमुळे नगरपरिषदेच्या कारभाराची बाजारपेठेत चर्चा सुरू आहे.
ठेकेदाराची मुदत संपत असताना कचरा वाहतुकीची वाहने पुढील ठेकेदाराकडे उत्तम व कार्यक्षम स्थितीत हस्तांतरित करण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. याप्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने वाहनांची प्रत्यक्ष तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
“माऊलीची माया सर्वांवरच आहे का ?” अशी उपरोधिक चर्चा सध्या यावल शहरात रंगली आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात