यावल दि.१५
शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी येथील बेथल इंग्लिश मेडीयम स्कूल शाळेत लक्षवेधी असा १५ ऑगस्ट ध्वजारोहण विद्यार्थी,शिक्षक,पालकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला.
त्या प्रसंगी शाळेचे चेअरमन बिजू जॉन,शाळेचे मुख्याध्यापक अॅनी मथायस, वनक्षेत्रपाल फटांगरे सर,नगरसेवक योगेश चौधरी,कला वाणिज्य कॉलेजचे प्राध्यापक सुनील पाटील सर, प्रशांत महाजन,नर्सरी जुनिअर केजी,सिनियर केजीचे मुलं,मुली सोबत त्यांचे पालक व शाळेचे शिक्षक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थी मुलांनी १५ आगस्ट स्वातंत्र्य दिनाबद्दल भाषण दिले तसेच मुलांनी नेताजी सुभाषचंद्र बोस,महात्मा गांधी,झाशी राणी असे राष्ट्रीय नेत्यांची वेशभुषा करून भाषण दिले.नर्सरी जुनिअर केजी सिनियर केजीचे मुलं मुली यांनी समूहगित गायन करून स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात,आनंदात साजरा केला.



टिप्पणी पोस्ट करा