नगरसेविका कल्पना वाणी यांच्या उपस्थितीत बाल संस्कार विद्या मंदिराची १०५ फूट तिरंगा रॅली.


यावल दि.१५
१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त
नगरपरिषद भारतीय जनता पार्टीच्या सदस्या सौ.कल्पना दिलीप वाणी यांच्या उपस्थितीत
१५ ऑगष्ट दिनानिमित्त बाल संस्कार विद्यामंदिर व माध्यमिक विद्यालय यांनी यावल शहरातून 
लक्षवेधी अशी १०५ फूट लांबीची तिरंगा रॅली काढली.

बाल संस्कार विद्या मंदिर शाळेत ८० वा स्वातंत्र्य समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेचे मुख्याध्यापक अतुल गर्गे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.या प्रसंगी वंदे मातरम,ध्वजगीत, महाराष्ट्र गीत,व्यसनमुक्ती व कॉपी मुक्ती शपथ घेण्यात आली.विद्यार्थ्यांनी समूहगीत, देशभक्तीपर गीत,सादर करून देशभक्तीपर जागृती केली.तसेच यावल नगरपरिषद नगरसेविका कल्पना वाणी यांनी १०५ फूट तिरंगा रॅलीत सहभाग नोंदविला.संस्थेचे अध्यक्ष आदरणीय महेश वाणी यांनी तिरंगा रॅलीस अभिवादन करून तिरंग्याचा सन्मान राखला.
सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर आधारित कवायत संचलन केले.प्रसंगी यावल शहरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच समाजसेविका वंदना देशपांडे,स्री रोग तज्ञ डॉक्टर कल्पना देशपांडे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आधारित शाळेतील पोस्टर व रांगोळी मॉडेल प्रदर्शनाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन विद्यार्थ्याना प्रोत्साहित केले.सदर समारंभासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळी,प्राथमिक,माध्यमिक,बालवाडीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योगदान दिले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात