यावल येथील जे.टी.महाजन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये सरस्वती देवीची आराधना / पूजा करीत चिमुकले लहान मुला -मुलींनी शिक्षक- शिक्षिका वृद्धांच्या मार्गदर्शनाखाली रक्षाबंधन सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला.
रक्षाबंधनहा हा सणबहीण
-भावाच्या अतूट नात्याचा पवित्र सण,रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या प्रेम,आपुलकी व जिव्हाळ्याच्या नात्याचा पवित्र सण आहे.या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याच्या सुखी,निरोगी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भाऊही बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचा संकल्प करतो. रक्षाबंधनातून बहीण-भावामधील स्नेहपूर्वक व प्रेमपूर्वक संबंध अधिक दृढ होतात.हा सण भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक नात्यांचे महत्त्व अधोरेखित करतो.राखी हा केवळ एक धागा नसून प्रेम,विश्वास,संरक्षण आणि जिव्हाळ्याचे प्रतीक आहे.या सणाच्या माध्यमातून कुटुंबातील संस्कार आणि परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जपल्या जातात.कितीही अंतर असले तरी या दिवशी बहीण -भावाच्या प्रेमाची आठवण अधिक गहिर होते.भेटवस्तूंपेक्षा या नात्यातील प्रेम आणि आपुलकी अधिक महत्त्वाची असते.रक्षाबंधनामुळे कुटुंबातील एकोपा आणि भावनिक बंध अधिक मजबूत होतात.म्हणूनच रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून बहीण-भावाच्या अतूट प्रेमाचा आणि भारतीय संस्कारांचा सुंदर उत्सव आहे.या शुद्ध हेतूने परंपरा अखंडित राहण्याच्या उद्देशाने रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला.
या कौतुकास्पद आणि संस्कृती टिकून राहण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या रंजना महाजन उपस्थित होत्या. तसेच या कार्यक्रमामध्ये इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे,पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे,गौरी भिरूड उपस्थित होत्या.अध्यक्षांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमात विद्यालयामध्ये मुलींनी आपल्या वर्गातील मुलांना राखी बांधून रक्षाबंधन हा सण साजरा केला.
कार्यक्रमा प्रसंगी सुजाता पाटील व प्राजक्ता वाणी यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन या सणाविषयी माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भारंबे यांनी केले.हा कार्यक्रम शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला



टिप्पणी पोस्ट करा