बाल संस्कार विद्या मंदिरात "संस्कृत" सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ.



यावल दि.२५ 
येथील बाल संस्कार विद्या मंदिरात दि.२४ ते ३० ऑगस्ट २०२६ या कालावधीत संस्कृत सप्ताहाचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.

विद्यार्थ्यांमध्ये संस्कृत भाषे विषयी आवड निर्माण व्हावी व संस्कृतचा दैनंदिन जीवनात वापर वाढावा,या उद्देशाने विविध उपक्रम घेण्यात आले.सर्व कार्यक्रम विद्यार्थ्यांनी पूर्णपणे संस्कृत भाषेत सादर केले. यामध्ये श्लोक,सुविचार,संस्कृत संभाषण,संख्या गीत,कथा व भाषणे यांचा समावेश होता.

कार्यक्रमासाठी भुसावळ येथील श्री चिपळोणकर सर व आशीष सैतवाल सर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी विविध सोपे व मनोरंजक खेळ घेऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. तसेच संस्कृत भाषेचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना संस्कृत बोलण्याचे आवाहन केले.
या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात संस्कृतमय वातावरण निर्माण झाले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील माळी,पालक दिनेश मुळे,सरिता गायकवाड,अतुल पवार,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.दर शनिवारला संस्कृत खेळ व गाणे घेण्याबाबत ठरविले. 
“संस्कृतं संस्कृतेर्मूलम्” या भावनेतून संस्कृत सप्ताहाची सुरुवात उत्साहात झाली.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात