यावल, दि. २७ जुलै
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल अंतर्गत कार्यरत शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांशी कथित गैरवर्तन,शिवीगाळ दमदाटी व मारहाणीचा प्रयत्न केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच,यावल यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्प कार्यालय, यावल येथे विविध कर्मचारी संघटनांच्या सहभागातून आंदोलन करण्यात आले.फैजपूर येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहाचे गृहपाल तथा प्रभारी सहाय्यक प्रकल्प अधिकारी जावेद इस्माईल तडवी,प्रकल्प कार्यालय यावल येथील कार्यालय अधीक्षक राकेश अहिरे तसेच कनिष्ठ लिपिक विनोद तायडे यांच्यासह इतर अधिकारी- कर्मचाऱ्यांना कार्यालयीन कामकाजा दरम्यान एका ठेकेदाराकडून शिवीगाळ, अपमानास्पद वर्तन व दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेचा आंदोलनकर्त्यांनी तीव्र निषेध नोंदविला.संघटनेच्या निवेदनानुसार,संबंधित अधिकारी व कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून विविध अधिकारी-कर्मचारी संघटनांनी या प्रकाराचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.आंदोलनादरम्यान संबंधित ठेकेदारास तात्काळ अटक करावी, शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल कठोर कायदेशीर कारवाई करावी तसेच आदिवासी विकास विभागाच्या सर्व कामकाजातून त्यास काळ्या यादीत ( ब्लॅकलिस्ट ) समाविष्ट करावे,अशी मागणी करण्यात आली. यासोबतच संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी व संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनास आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना,महाराष्ट्र
राज्य (नाशिक) प्रकल्प यावल, आदिवासी विकास विभाग कर्मचारी एकता मंच,यावल, स्वाभिमानी शिक्षक-शिक्षकेतर संघटना महाराष्ट्र राज्य ( जिल्हा
जळगाव), सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचारी संघटना, यावल तसेच विविध कर्मचारी व सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दर्शविला. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात शासकीय धोरणे व योजना प्रभावीपणे राबविणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित,सन्मानपूर्वक व भयमुक्त वातावरणात काम करण्याचा अधिकार असल्याचे नमूद केले.
शासकीय कर्तव्य बजावत असताना अधिकारी व कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन,दमदाटी किंवा दबावाचे प्रकार घडणे हे अत्यंत निषेधार्ह असून अशा घटनांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्टकेले.त्यामुळे संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी संघटनांच्या वतीने करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी प्रशासनास निवेदन सादर करून मागण्यांची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले असून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठीआवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी मागणी केली. तसेच संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व शासकीय कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, अशीही मागणी करण्यात आली.
मागण्यांची पूर्तता न झाल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.याआंदोलनात विविध कर्मचारी
संघटनांचे पदाधिकारी,अधिकारी गृहपाल, मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी तसेच
कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



टिप्पणी पोस्ट करा