यावल.गुरुवार दि.२५
चाळीसगाव परिक्षेत्रातील सामाजिक वनीकरण कार्यालयातील प्यारेलाल
विठठ्ल महाजन,वय ५३ वर्षे हा
लाचेची ७,५००/- रुपये रकम घेतांना नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यातील वन विभागात मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की :- यातील तक्रारदार यांचे मौजे तरवाडे ता.चाळीसगाव शिवारातील शेतात चंदन वृक्ष
लागवड व संवर्धनासाठी शासनामार्फत निधी मिळण्यासाठी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र चाळीसगाव येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत अर्ज केला असता त्यांचा अर्ज मंजुर होवुन त्यांचे
वृक्ष लागवडी व संवर्धनासाठी प्रती वर्ष १,५०,००० /- रु. प्रमाणे तीन वर्षासाठी ४,५०,०००/- रू. मंजुर झाले होते.सदर वृक्ष लागवडीसाठी कुशल कामाचे खर्चाचे बिल सादर केले होते.सदर सादर केलेल्या देयकाचे ५०,०००/- रक्कमेचे बिल काढुन देणेसाठी बिलाचे १५% टक्के प्रमाणे ७५००/- रुपयांची लाचेची मागणी पंच साक्षीदार यांचे समक्ष दिनांक २४/०६/२०२६ रोजी करून सदर मागणी केलेली ७,५००/- लाचेची रक्कम बुधवार
दिनांक २४/०६/२०२६ रोजी स्विकारतांना रंगेहात पकडले म्हणुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला आरोपीता विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची कारवाई
भारत तांगडे, पोलीस अधीक्षक,
माधव रेडडी, अपर पोलीस अधीक्षक,सुनिल दोरगे, अपर पोलीस अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्र नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली
सापळा अधिकारी:- पोलीस निरीक्षक श्रीमती नेहा सुर्यवंशी, ला.प्र.वि. नाशिक मो.क्र.
७७७४०११०७८ सापळा पथक :- पो. हवा / विनोंद चौधरी, पो.कॉ / अनिल गांगोडे, पो. शि/ योगेश शिंदे, तपास अधिकारी:- पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, ला.प्र.वि. जळगाव मो.क्र.
७५८८०९५२९६
लाचलुचपत विभागातर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की,भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक परिक्षेत्र, नाशिक येथे संपर्क करावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक आपले सेवेशी सदैव तत्पर
संपर्क पत्ता
संकेतस्थळ:- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक :- acbmaharashtra.gov.in
ऑनलाईन तक्रार :- acbmaharashtra.net
ईमेल :-spacbnasik@mahapolice.gov.in
टोलफ्री क्रमांक :- १०६४,
दुरध्वनी क्रमांक :०२५३-२५७५६२८,०२५३-२५७८२३०
संपर्क क्रमांक
१) ला.प्र.वि. नाशिक - व्हटसअॅप क्रमांक :- ९५४५०३१०६४,
२) ला. प्र. वि. जळगाव - व्हटसअॅप क्रमांक :- ७५७८६६१०६४, ३) ला.प्र.वि. अहिल्यानगर व्हटसअॅप क्रमांक :- ९१६८६४१०६४.
४) ला.प्र.वि. धुळे - व्हटसअॅप क्रमांक :- ७७९८१६१०६४ , ५) ला. प्र. वि. नंदुरबार - व्हटसअॅप क्रमांक :- ९४२३५४१०६४
नेहा तुषार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक.



टिप्पणी पोस्ट करा