यावल दि.१० 
यावल येथील बाल संस्कार विद्या मंदिरातील गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींचा सत्कार येथील आंबेडकर नगर मध्ये करण्यात आला.

फेब्रुवरी २०२६ इयत्ता १० च्या  परीक्षेत विद्यार्थिनी मध्ये प्रथम क्रमांक कु.भूमिका सोपान इंगळे  91%,द्वितीय क्रमांक कु.भाग्यश्री अनिल शिरसाट 89.80% या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले. तसेच प्रथम क्रमा.खुशाल कैलास चौधरी 91.60 गुण मिळवले.आंबेडकर नगरमधील आनंदमय वातावरणात विद्यार्थ्यांचे अभिनंदन स्वागत सत्कार त्यांच्या पालकांसह सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नगरसेवक उमेश फेगडे होते.विद्यार्थिनींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले.तसेच डॉ.विवेक अडकमोल सेवानिवृत्त शिक्षक सरांगधर अडकमोल सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.नगरसेवक योगेश चौधरी, सारंग अडकमोल सर,आयोजक डॉ.विवेक अडकमोल,शिक्षिका मनीशा भालेराव,आकाश चोपडे,
रोशन भाऊ येवले,चेतन आढळकर,भूषण फेगडे,बाळू अडकमोल,विनोद भिल भगवान भिल,अनुराग अडकमोल,गिरीश सोनावणे,अरुण लोखंडे,विष्णू भाऊ भालेराव,सोपान इंगळे, निलेश भोई,किशोर अंकल,सागर भाऊ कोळी सर्व बोरावल गेट परिसरातील उपस्थित नागरिकांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात