सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता ५ लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडला गेला. अहिरेचे चार चाकी वाहन सुद्धा जप्त. वरिष्ठ अधिकारी कोण.?

यावल दि.९ 
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापासून आणि लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयापासून काही मीटर अंतरावर असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्ग २ च्या शाखा अभियंत्याला आज शनिवार दि.९ मे २०२६ रोजी ५ लाख रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक जळगाव विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून आरोपीचे महागडी बलेनो चारचाकी वाहन / ( एम एच १९ - सी - २६१९ ) गाडी सुद्धा जप्त केले तसेच लाच घेणाऱ्या शाखा अभियंत्याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांला सुद्धा रकम देण्याचा स्पष्ट उल्लेख केल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यावर काय कारवाई होणार..? याकडे आता जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार कॅम्प जळगाव पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे यांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, यातील तक्रारदार हे सब कॉन्ट्रक्टर असुन त्यांना जळगांव शहरात वार्ड क्र. १४ विनोबानगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रोडचे ८०,३९,७४२/- रुपयाचे काम सन २०२४ मध्ये मंजुर झाले होते. सन २०२५ मध्ये सदरचे काम मुदतीत पुर्ण केल्यानंतर निधी उपलब्ध नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगांव यांचेकडुन नमुद कामाचे एकुण ८०,३९,७४२/- रू. या रक्कमेपैकी तक्रारदार यांना अंदाजे ५८ लाख रुपये बिल मंजुर झाले होते.त्यापैकी तक्रारदार यांना अंदाजे ४२ लाख रुपये माहे ऑक्टोबर २०२५ मध्ये प्राप्त झाले होते.तक्रारदार यांचे वर नमुद कामाचे उर्वरीत ३८,४९,७४२/- रू.असे एकुण बिल अद्याप पावेतो अप्राप्त होते.त्यामुळे तक्रारदार सदर बिलाबाबत विचारपुस करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग,जळगांव येथील योगेश अभिमन्यु अहिरे, शाखा अभियंता, वर्ग-२ यांना भेटले असता त्यांनी तक्रारदार यांच्याकडे यापुर्वी अदा केलेल्या बिलाचे काम करुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरीत बिल मंजुर करुन देण्यासाठी १८,००,०००/- रुपयांची मागणी केली होती. सदरबाबत तक्रारदार यांनी दि.५ मे २०२६ रोजी ला.प्र.वि.जळगाव घटकाचे सापळा पथकाकडे तक्रार लिहून दिली होती.तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दि. ०५.०५.२०२६ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग,जळगाव येथे सदर तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी केली असता लोकसेवक योगेश अभिमन्यु अहिरे शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगांव यांनी तक्रारदाराकडे यापुर्वी अदा केलेल्या बिलाचे काम करुन दिल्याचे मोबदल्यात व उर्वरीत बिल मंजुर करुन देण्यासाठी प्रथम १८,००,०००/- रूपयांची मागणी करून तडजोडी अंती १५,००,०००/- रू. 
( त्यात ७,५०,०००/-रू स्वतःसाठी व उर्वरित ७,५०,०००/- रू.त्याचे वरीष्ठ अधिकारी यांच्यासाठी ) मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता म्हणुन ५,००,०००/- रू लागलीच व उर्वरीत १०,००,०००/- रू काम झाल्यानंतर स्विकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.आज शनिवार दि.९ मे २०२६ रोजी सापळा कारवाई दरम्यान नमुद लोकसेवक योगेश अभिमन्यु अहिरे शाखा अभियंता,सा.बां. विभाग जळगांव यांनी तक्रारदार यांच्याकडुन वरप्रमाणे मागणी केलेली ५,००,०००/- रू. पंचासमक्ष तक्रारदार यांना लोकसेवक योगेश अहिरे यांनी
त्यांच्याकडील निळया रंगाची बलेनो कार क्र. एम. एच. १९, सी. व्ही. २६१९ यामधील समोरील सिटखाली ठेवण्यास सांगुन लाच रक्कम स्विकारली असता त्यांना ला.प्र.वि.जळगाव विभागाने रंगेहाथ पकडले. तसेच त्यांचे वर नमूद लाचमागणी व्यतिरिक्त एकूण बिलाचे ६ टक्के प्रमाणे रक्कम नगरसेविकाचे मुलास देण्यास तक्रारदार यांना पंचासमक्ष सापळा कारवाई दरम्यान सांगून लाच मागणी प्रोत्साहन दिले म्हणून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
सदरची कारवाई नाशिक ला.प्र.वि. परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, नाशिक ला.प्र.वि. परिक्षेत्राचे ऑफर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव ला.प्र.वि. पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर,पोलीस निरीक्षक श्रीमती रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील,म.पो.हे कॉ.संगीता पवार, पो.हे.का. बाळू मराठे, पो.कॉ. प्रदीप पोळ, भूषण पाटील यांनी कारवाई केली पुढील तपास पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर करीत आहे. 
      या प्रकरणातील सार्वजनिक बांधकाम विभागातील लाच घेणारा शाखा अभियंता योगेश अहिरे याने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला सुद्धा लाचेची रक्कम द्यावी लागेल असे म्हटले आहे त्यामुळे तो वरिष्ठ अधिकारी कोण.? लाच घेणारा आणि वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उत्पन्न श्रोता पेक्षा त्यांच्याकडे किती रोकड प्रॉपर्टी जंगम मालमत्ता आहे याची चौकशी केल्यास या गुन्ह्यात पुढील कारवाईसाठी सबळ पुरावा महत्त्वाचा ठरणार असल्याची चर्चा जळगाव जिल्ह्यात आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात