यावल दि.८
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल विद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करून १००% निकालाची परंपरा कायम ठेवत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये:
*प्रथम -* वैष्णवी युवराज भंगाळे - *90.60%* *द्वितीय -* तनुश्री कैलास अहिरे - *90%* *तृतीय -* योगिनी गणेश जावळे - *89%* *चतुर्थ -* निधी पंकज पाटील - *87.40%* *पंचम -* प्रांजल श्रीकांत पाटील - *85.60%* यांनी विशेष प्राविण्य मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष *शरद भाऊ जीवराम महाजन*, मुख्याध्यापिका *सौ. रंजना महाजन मॅडम, दीपाली धांडे मॅडम*, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचे सहकार्य महत्त्वाचे ठरल्याचे मत मुख्याध्यापकांनी व्यक्त केले.
दरम्यान,शाळेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.



टिप्पणी पोस्ट करा