यावल पंचायत समितीत सीईओ करिष्मा नायर आल्याने सर्व कर्मचाऱ्यांची होती उपस्थिती. अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावल दि.२३ 
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी आज गुरुवार दि.२३ रोजी यावल पंचायत समितीत आढावा बैठक घेतल्याने पंचायत समिती कार्यक्षेत्रातील पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित असल्याने ग्रामस्थांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात आले. कारण इतर दिवशी कोणतेही जबाबदार अधिकारी पंचायत समिती कार्यालयात वेळेवर कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नसल्याने त्यांचे अधिनस्त अधिकारी कर्मचारी सुद्धा आपल्या कामकाजाच्या ठिकाणी उपस्थित राहत नसल्याने कामकाजावर विपरीत परिणाम झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांनी संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. 

विविध विभागांच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत अनेक अधिकारी कर्मचारी हे आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणी कार्यालयीन वेळेत हजर राहत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करीत असतात आणि कामकाजा संदर्भात अनेक तक्रारी असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शासकीय कामकाजातील अनियमितपणा अपूर्ण कामे आणि नागरिकांना होणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “कामात कसूर चालणार नाही” असा कडक इशारा दिला.या बैठकीस गट विकास अधिकारी,ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, शिक्षण, कृषी,पशुसंवर्धन, घरकुल आणि आरोग्य विभागाचे सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक विभागाकडून सुरू असलेल्या योजनांची माहिती घेताना सीईओ नायर यांनी प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देत कामकाज नियमित आणि मुदतीत करण्याबाबत स्पष्ट आणि कडक सूचना दिल्या.
आढावा बैठक झाल्यानंतर त्यांनी किनगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या अपुरी जागा असल्याने आणि ग्रामीण रुग्णालयातील पी.एम. रूममध्येच प्राथमिक आरोग्य केंद्र चालवावे लागत असल्याने वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणीं येत असल्याचे निदर्शनास आले.यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.तरन्नूम शेख यांच्याशी सविस्तर चर्चा करून सीईओ करिष्मा नायर यांनी परिस्थितीची दखल घेतली. “रुग्णांना योग्य सुविधा मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे स्पष्ट करत प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव लवकरच योग्य ठिकाणी स्थलांतरित केले जाईल असे सांगितले,या धडक कारवाईमुळे पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून,संबंधित विभागांना आता कामाकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आढावा बैठकीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची यावल पंचायत समितीची आढावा बैठक प्रसिद्धी माध्यमांपासून आणि आढावा बैठकीची माहिती जनतेपासून संबंधित अधिकाऱ्यांनी लपवून ठेवल्याने याबाबत लेखी तक्रार केली जाणार आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात