भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त रावेर विधानसभा मतदारसंघात डॉ.कुंदन फेगडे यांनी दिल्या शुभेच्छा.


यावल दि.६ 
६ एप्रिल १९८० रोजी 'भारतीय जनता पार्टी' नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली,त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे.त्यानिमित्त रावेर विधानसभा मतदारसंघातील आश्रय फाउंडेशन तर्फे यावल येथील डॉ. कुंदन फेगडे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

गेल्या ४६ वर्षांमधील भाजपाचा प्रवास म्हणजे राष्ट्रभक्ती,जनसेवा आणि हिंदुत्व या त्रिवेणी मार्गावरील गौरवशाली इतिहास आहे.सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा ! देण्यात आल्या.

आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात 'विकसित भारत' आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात 'विकसित महाराष्ट्र' घडवण्यासाठी भाजपा परिवार अविरतपणे प्रयत्न करीत आहे आणि पुढे सुद्धा कार्यरत राहणार आहेत.या शुभेच्छांमुळे भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एक नवचैतन्य निर्माण झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात