डॉ.भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी जिल्हाध्यक्षपदी मनिष साबळे यांची नियुक्ती.

यावल दि.२० 
दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच डॉ भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो.लि. बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजरत्न आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत रवींद्र गुरचळ डॉ भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो.लि.बँकेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यांच्या नेतृत्वात नुकतीच लुंबिनी बुद्ध विहार वरणगाव येथे(AMSC ) बँक जळगाव जिल्हा कमिटीची नियुक्ती करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय समन्वयक रविकांत जाधव(BSI), महाराष्ट्र राज्याध्यक्ष रविंद्र गुरचळ(AMSC), प्रमुख उपस्थिती नायब तहसीलदार तथा भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ कार्यकर्ते शशिकांत इंगळे, राज्य कोषाध्यक्ष किशोर भालेराव (AMSC),अमरावती विभागीय समन्वयक रामदास घेवंदे (AMSC), जळगाव जिल्हा अध्यक्ष प्रमिला भालेराव (BSI) तसेच महाराष्ट्र राज्याध्यक्ष रवींद्र गुरचळ (AMSC) यांची सहचारिणी आरती रवींद्र गुरचळ ,जनता बँकचे मॅनेजर बापू बोरसे यांच्या उपस्थिती मध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
रविंद्र गुरचळ यांनी जळगाव जिल्हा(AMSC ) कमिटीची नियुक्ती करून मान्यवरांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

जिल्हा कार्यकारिणी पुढील प्रमाणे
 जळगाव जिल्हा अध्यक्ष मनिष शशिकांत साबळे , सचिव किरण गोपाळ पांडव , कोषाध्यक्ष राजेंद्र अमृत तायडे, कार्यक्रम समन्वयक नागसेन बन्सीलाल यशोदे, समन्वयक सुजाता चेतन तायडे, समन्वयक महेंद्र सिताराम कोचुरे, समन्वयक गौतम रामदास बोदडे. याप्रमाणे डॉ भिमराव रामजी आंबेडकर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सो.लि. ची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
तसेच जळगाव जिल्ह्यातील शेअर होल्डर झालेल्यांना शेअर होल्डर सर्टिफिकेट आणि बँक बचत खाते पास बुक वितरित करण्यात आले.

सदर प्रसंगी नाशिक विभागीय सचिव संदिप तायडे , जळगाव जिल्हा महासचिव चेतन नन्नवरे, जिल्हा कोषाध्यक्ष संजय गुरचळ, जिल्हा सहकोषाध्यक्ष शरद तायडे, ज्येष्ठ कार्यकर्ते लक्ष्मण भालेराव, रेल्वे असोसिएशन एससी एसटी संघटनेचे सचिव चेतन तायडे, भुसावळ तालुका सचिव प्रमिला गुरचळ, तालुका कोषाध्यक्ष कीर्ती साबळे, भुसावळ तालुका विहार समन्वयक अनिल सुरवाडे, भुसावळ शहर शाखा अध्यक्ष सुरेखा तायडे, भुसावळ शहर शाखा संघटक रेखा पांडव, भुसावळ शहर संघटक प्राची शेळके,तसेच जळगाव जिल्ह्यातील शेअर होल्डर झालेले उपासक उपासिका यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.जळगाव जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर चार हजार शेअर होल्डर तयार करून बँक स्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात