किनगाव येथे “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” संपन्न.

यावल दि.१७
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत किनगाव मंडळात किनगाव येथे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” शुक्रवार दि.१७ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.

या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार यावल श्रीमती मोहनमाला नाझीरकर यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी,तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिबीरामध्ये देण्यात आलेले ठळक लाभ : जिवंत सातबारा वाटप एकूण वारस नोंदी : ११४
प्रातिनिधिक वाटप : २१, उत्पन्न दाखले वाटप – ९, शिधापत्रिका वाटप १३,जात प्रमाणपत्र वाटप ३
तुकडा शेरा कमी करणे ( ७/१२ उतारा व आदेश ) एकूण तुकडा सातबारा : ८८२ पात्र प्रकरणे : ६९४ प्रातिनिधिक वाटप : १७ अधिवास ( Domicile ) व नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र ०५ विशेष अर्थसाहाय योजना लाभार्थी ०८ लक्ष्मी मुक्ती सातबारा वाटप १ , आदिवासी खातेदार नोंदी ४ घरकुल लाभ २
आयुष्मान कार्ड (आरोग्य विभाग) १६, बेबी किट वाटप ०,  ट्रॅक्टर वाटप १ याप्रमाणे वाटप करण्यात आले

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात