प्रभारी महिला मुकादम यांना पदावरून कमी केल्याने मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल.

यावल दि.२३
नगरपरिषद प्रभारी महिला मुकादम कल्पना बबलू घारू यांना त्यांच्या पदावरून कमी केल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली.

यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे दि २३ रोजी प्रभारी मुकादम स्वच्छता कर्मचारी सौ.कल्पना बबलू घारू यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की,सेवा जेष्टता यादी नुसार माझी यावल नगरपरिषद येथे स्वच्छता कर्मचारी या पदावर प्रशासकीय कामास्तव जा.क्र./यानप/आ.वि./२७० दि.२७ फेब्रुवारी २०२४ अन्वये प्रभारी मुकादाम आरोग्य विभाग या पदावर नेमणूक करण्यात आलेली होती व त्यानुसार नेमून दिलेले काम पूर्ण इनामे इतबारे केले आहे.व माझ्यावर आज पर्यंत कोणतीही तक्रार अथवा कार्यवाही करण्यात आलेळी नाही.तसेच यावल नगरारीषद मध्ये स्वच्छता मुकादम पद हे एकाकी असल्याने यावल शहराची हद्द वाढ सन २००९ मध्ये झालेली असून हद्द वाढ नुसार कामाचा व्याप वाढलेला आहे.तरी माझी सेवा ( प्रभारी मुकादम ) या पदावरं दि.२७ फेब्रुवारी २०२४ ते १६ जानेवारी २०२६ पर्यंत झालेली आहे.या कालावधीत मी केलेल्या कामाचे अवलोकन न करता नगरपरिषद यावल येथे मला जा.क्र.यानप/६७/२०२६ दि. १६ जानेवारी २०२६ ला प्रशासकीय कारण न सांगता मला ( प्रभारी मुकादम ) या पदावरून कमी करण्यात आलेले आहे.तरी माझ्या सेवेचा अनुभव लक्षात घेता मला स्वच्छता कर्मचारी ( प्रभारी मुकादम ) आरोग्य विभाग या पदावर नियुक्ती करण्यात यावी व माझ्यावर झालेल्या अन्याया बाबत योग्य ती कार्यवाही करावी ते दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले असल्याने यावल नगरपरिषद मुख्याधिकारी आणि जिल्हाधिकारी जळगाव काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राजकारणाचे लक्ष लागून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात