यावल दि.४ ( अमीर पटेल )
यावल नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्र. २ विस्तारित भागातील आयेशा नगर / काजी प्लॉट परिसरात वापराचे घाण पाणी वाहून जाण्यासाठी गटार नसल्याने यावल नगर परिषदेने नवीन गटार ( ड्रेनेज लाईन ) तात्काळ बांधण्याची मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.
यावल शहरातील प्रभाग क्र. २ आयेशा नगर, काजी प्लॉट परिसर] येथे पक्की गटार नसल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर व उघड्या जागेत साचून राहते.त्यामुळे दुर्गंधी, डासांची उत्पत्ती होत आहे त्यामुळे अनेकांना साथीचे आजार होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिक बिकट आणि आरोग्यास हानिकारक होत असते.शालेय विद्यार्थी, लहान मुले मुली यांच्यासह महिला व ज्येष्ठ नागरिकांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर यावल नगरपालिकेच्या नगरअध्यक्षा छाया अतुल पाटील व मुख्याधिकारी यांनी तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून नवीन आरसीसी गटार बांधण्याबाबत कार्यवाही करावी.
“गटार नसल्याने आरोग्य व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.नगरपालिकेने तातडीने सर्वेक्षण करून काम मंजूर करावे व गटारीचे नवीन बांधकाम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे,” अशी मागणी प्रभागातील नागरिकांनी केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा