यावल दि.२४
गुरुवार दि. २३ मे रोजी येथील बाल संस्कार विद्या मंदीरातील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना संस्थेतर्फे आणि शिक्षक वृंदांच्या उपस्थितीत निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष महेश वाणी हे उपस्थित होते तर प्रमुखा पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अतुल गर्गे हे होते.यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले तर मुलींनी स्वतः रचलेले गाणे म्हणून शाळेच्या शैक्षणिक कार्याचे, कामकाजाचे कौतुक केले.शिक्षक पंढरीनाथ महाले,राजेंद्र फालक,
सविता गाजरे,अतुल पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेतुन आदर्श विर्द्यार्थी म्हणून साई एकनाथ कंखरे व विद्यार्थिनीं मधुन सानवी पंकज गडे यांचा स्मृती चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रशांत महाजन यांनी कार्यक्रमाचे सुत्र संचालन केले. संजय चौधरी,शिवशंकर सोळंकी,सुनिल श्रावगी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .



टिप्पणी पोस्ट करा