विरोधकांनी शालेय समिती निवडीला केलेला विरोध बेकायदेशीर... अतुल पाटील.

यावल दि.१७ 
आज शुक्रवार दि.१७ रोजी यावल नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न झाली.त्यात विषय क्र.८ हा न.पा.संचलीत साने गुरूजी माध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालयासाठी शालेय समिती गठीत असा होता.त्यासाठी सत्ताधारी गटाचे नगरसेवक पराग सराफ यांनी लेखी स्वरूपात सूचना मांडून नगराध्यक्षा सौ. छायाताई पाटील यांना शालेय समिती अध्यक्ष करण्यात यावे व नगरसेवक सागर चौधरी,सौ.वैशाली बारी,शेख शाहिनबनो शेख रज्जाक यांना सदस्य करून पदसिद्ध सचिव मुख्याध्यापक व एक शिक्षक प्रतिनिधी व शिक्षकेतर प्रतिनिधी नेमण्याबाबत सूचना मांडली त्यास ८ सदस्य असलेल्या काँग्रेस गटनेत्या कामारुनिसाबी सैफुद्दीन यांनी अनुमोदन दिले होते.असे असताना भाजप नगरसेवक हेमराज उर्फ बाळू फेगडे यांनी या समिती साठी राकेश कोलते यांचेसह अन्य ३ नावे घ्यावीत अशी सूचना केली.एकाच विषयासाठी दोन वेगवेगळ्या सूचना प्राप्त झाल्याने सदर सूचना मतदानास टाकावी अशी सूचना अतुल पाटील यांनी मांडली असताना विरोधकांनी सभात्याग केला. वास्तविक त्यांनी केलेला सभात्याग हा बेकायदेशीर होता.आम्ही बहुमताच्या जोरावर मंजूर केलेला ठराव जर बेकायदेशीर असेल तर आपण जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार करावी अशी विनंति त्यांना केली मात्र त्यांनी सभात्याग केला.वास्तविक पाहता आम्ही आजच्या सभेत केलेली शालेय समितीचे गठण शासन निर्णय दि.२७ मार्च २०२३ प्रमाणे व माध्यमिक शाळा संहिता १९८६ मधील प्रकरण १ कलम १७ मधील तरतुदी व नियम १० प्रमाणे शालेय समिती निवडलेली आहे असे असताना मात्र केवळ विरोधाला विरोध ही भूमिका विरोधकांनी घेऊन सभात्याग केला तो बेकायदेशीर आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात