कै.गंगाधरपंत पांडुरंगराव देशमुख स्मृती दिन उत्साहात; शिक्षणसेवेच्या वारशाचा जागर

यावल दि.८
दि.८ एप्रिल २०२६ रोजी डी.एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,थोरगव्हाण येथे यावल येथील ‘कै.गंगाधरपंत पांडुरंगराव देशमुख स्मृती दिन’ (पुण्यतिथी) श्रद्धाभावाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय विद्यमान संचालक चंद्रकांत सुराजी पाटील होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर,संचालक मधुकर कोल्हे,मुख्याध्यापक डी. के.पाटील,तसेच सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कै.देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
मुख्याध्यापक डी.के.पाटील व ज्येष्ठ शिक्षक वाय.जे.कुरकुरे यांनी त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला.त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान हे पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे असल्याचे सांगितले. समाज धुरीनांचा दृष्टीकोन :कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत सुराजी पाटील यांनी सांगितला शैक्षणिक दृष्टीकोन कै.गंगाधरपंत पांडुरंगराव देशमुख यावल यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचे कार्य हे केवळ एका संस्थेपुरते मर्यादित नसून,ते समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी आहे.ग्रामीण भागात शिक्षणाची ज्योत प्रज्वलित करून अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.आजच्या स्पर्धात्मक आणि बदलत्या युगात शिक्षण क्षेत्र अनेक आव्हानांना सामोरे जात आहे.अशा वेळी त्यांच्या कार्यातून मिळणारे कर्तव्यनिष्ठा,समसुचकता प्रामाणिकपणा आणि समाजाभिमुखतेचे धडे अत्यंत महत्त्वाचे ठरतात.पुण्यतिथी सारखे कार्यक्रम हे केवळ औपचारिकता न राहता,ते मूल्यसंवर्धनाचे आणि प्रेरणेचे व्यासपीठ ठरले पाहिजेत.विद्यार्थ्यांनी त्यांच्या आदर्शांचा स्वीकार करून शिक्षणाला समाजनिर्मितीचे साधन म्हणून पुढे नेणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन एस.बी.सपकाळे यांनी केले.सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बांधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होत.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात