यावल दि.२
जळगाव येथील यांत्रिकी विभागीय पथक कार्यकारी अभियंता धनंजय वामन पाटील यांच्या संदर्भात भारतीय संविधान नियमय १४ चे उल्लंघन होत असल्याची तक्रार नशिराबाद येथील नितीन सुरेश रंधे यांनी नाशिक येथील यांत्रिकी मंडळ मुख्य अभियंता यांच्याकडे केली.
दि.१ एप्रिल २०२६ रोजी दिलेल्या तक्रार अर्जात नशिराबाद येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश रंधे यांनी दिलेल्या तक्रार अर्ज नमूद केले आहे की,आजपर्यंत धनंजय वामन पाटील,
कार्यकारी अभियंता,यांत्रिकी विभागीय पथक जळगांव यांचेवर काहीही कार्यवाही झालेली नाही.कार्यकारी अभियंता वर्ग-१ हे अधिकारी एकाच जिल्ह्यात एकाच ठिकाणी आहे.म्हणजे बदलीशासन
निर्णयाची आपणाकडून अंमलबजावणी होत नाही. म्हणजेच भारतीय संविधान नियम १४ नुसार आपले अधिपत्त्याखाली कार्यरत असलेल्या इतर अधिकारी वर्ग १ यांचेवर अन्याय होत आहे. धनंजय वामन पाटील फक्त यांचे साठीच भारतीय संविधान नियमय १४ चे उल्लंघन होत आहे असे आम्हांस दिसून येत आहे तरी कृपया वरील तक्रार अर्जाचे त्वरीत निराकरण करण्यात यावे.अन्यथा नाईलाजास्तव आपले कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल.असा इशारा नितीन रंधे यांनी दिल्याने नाशिक यांत्रिकी मंडळ मुख्य अभियंता काय कार्यवाही करणार.? याकडे लक्ष लागून आहे.



टिप्पणी पोस्ट करा