यावल येथील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.



यावल दि.२६ 
यावल येथील सातोद रोडवरील शनी मंदिर,मारुती मंदिर आणि श्रीराम मंदिरात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज गुरुवार दि.२६ रोजी सातोद रोडवर असलेल्या पेठेच्या श्रीराम मंदिरात रामनवमी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शहतील काळभैरव भजनी मंडळ व भोला भजनी मंडळ यांच्यासह इतर भजनी मंडळांनी प्रभू श्रीराम यांच्यावर आधारित असलेल्या भजनांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले ठीक १२ वाजता रामाचा जन्मोत्सव हा मंदिरात साजरा करण्यात आला यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर तसेच यावल, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, श्रीराम मंदिराचे सर्व पंच व अध्यक्ष यावेळी उपस्थित होते मंदिराचे पुजारी पप्पू महाराज जोशी यांच्या हस्ते श्रीरामाचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भक्तांना पंजरीचा प्रसाद वाटप करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात