वैकुंठ यात्रा तथा अंत्ययात्रेचे वाहन खरेदी करा : नगरसेवक सागर चौधरी यांची जनहिताची मागणी.

यावल दि.१७
शहरात शासकीय स्तरावर गोरगरीब जनतेसाठी मृतदेह वाहून नेणारे कोणतेही वाहन उपलब्ध नसल्याने वैकुंठ यात्रेसाठी तथा अंत्ययात्रेचे
वाहन खरेदी करण्याची जनहिताची मागणी नगरसेवक सागर चौधरी यांनी यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां सौ.छायाताई अतुल पाटील, नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे केली.

आज दि.१७ रोजी यावल नगरपरिषद यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,यावल शहरात गोरगरीब घरातील मयत झालेल्या व्यक्तींना स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यासाठी म्हणजे त्यांची वैकुंठ धाम यात्रा / अंतयात्रेचा प्रवास सुखकर होण्यासाठी शासकीय स्तरावर कोणतीही शववाहिका उपलब्ध नसल्याने गोर गरीब जनतेला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो व अनेक वेळा त्यांना आर्थिक अडचणी येतात म्हणून शहरातील नागरिकांची सोय व मानवतेच्या दृष्टीने,जनहितासाठी नगरपरिषदेकडून एक शववाहिका उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक झाले आहे.यावल नगरपरिषदकडून शववाहिका खरेदी करण्यात आली तर शहरातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.म्हणून यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां सौ.छायाताई अतुल पाटील,मुख्याधिकारी निशिकांत गवई की यांनी शहरासाठी अंत्ययात्रेसाठी एक वाहन / गाडी खरेदी करून नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावे अशा मागणीचे लेखी निवेदन नगरसेवक सागर सुनील चौधरी यांनी यावल नगरपरिषद लोकनियुक्त अध्यक्षां छायाताई पाटील यांच्याकडे दिले.यावेळी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत सदस्य अतुल वसंतराव पाटील व त्यांचे प्रभागातील काही समर्थक, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात