विज बिल थकबाकी वसुलीसह स्मार्ट मीटर बसविण्यासाठी ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद.


यावल दि.११ येथील वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली वसुली अधिकारी विनायक गोतरकर यांना वीज वितरण कंपनीच्या थकबाकी वसुलीसाठी आणि जुने मीटर तपासून स्मार्ट मीटर बसविण्यासाठी संपूर्ण यावल शहरात वीज ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि सूचनेनुसार उपकार्यकारी अभियंता सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक अभियंता तथा वसुली अधिकारी विनायक गोतरकर रवि कोळी, प्रविण पाटील,शकील तडवी, विशाल कोळी,राहूल शेजवळ, संतोष महाजन शहरातील खाजगी आणि व्यावसायिक वीज ग्राहकांच्या घरोघरी भेटी देऊन थकबाकीदार ग्राहकांकडून वीज बिल वसुली करीत जुने मीटर तपासणी करीत काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याची धडक मोहीम राबवित आहे यात त्यांना ग्राहकांकडून उत्तम सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

यावल शहरात आतापर्यंत हजारो वीज बिल ग्राहकांचे जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले त्यांना पहिल्यापेक्षा कमी अचूक अशी वीज बिल येत असल्याने ग्राहक स्मार्ट मीटर बसविण्यासाठी स्वतःहून आग्रही असल्याचे स्मार्ट मीटर बसविणाऱ्या कर्मचाऱ्यानी माहिती देताना सांगितले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात