यावल दि.८
येथील बाल संस्कार विद्या मंदिर आणि जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
येथील बाल संस्कार विद्या मंदिर मधे जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सविता वारके मॅडम,प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक सुनिल माळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुंदर व प्रभावी सूत्रसंचालन शिवशंकर सोळंकी यांनी केले.कार्यक्रमाची सुरुवात पंढरीनाथ महाले सर यांच्या प्रास्ताविकाने झाली.त्यांनी महिला दिनाचे महत्त्व सांगून समाजात स्त्रियांचे स्थान आणि योगदान याबद्दल मार्गदर्शन केले.इयत्ता पहिलीच्या येवले नारायणी,संचिता सोनवणे, लावण्या बारी - राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली तसेच राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची वेशभूषा माही सोनवणे हिने केली. इयत्ता पहिली ते सातवी च्या विविध विद्यार्थ्यांनी कार्यक्रम सादर केले. महिला सन्मान व स्त्रीशक्ती या विषयावर नाटिका, गाणी, कविता आणि भाषणे सादर करून उपस्थितांचे मन जिंकले.या कार्यक्रमातून महिलांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि स्त्री सन्मानाचा संदेश देण्यात आला.शाळेतील शिक्षिका आणि महिला कर्मचारी वर्ग यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या शेवटी अतुल पवार यांनी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.एकूणच विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले.
याच प्रमाणे व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.रंजना महाजन मॅडम यांनी सरस्वती मातेच्या प्रतिमेला हार अर्पण करून केली. तसेच इंग्लिश मीडियमच्या प्राचार्या दिपाली धांडे मॅडम या देखील उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका सौ . गौरी भिरूड मॅडम व श्रीमती राजश्री लोखंडे मॅडम यांनी उपस्थिती दिली.
या कार्यक्रमात शाळेच्या प्राचार्या सौ.रंजना महाजन मॅडम यांनी मुलांना मार्गदर्शन केले.तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा पाटील मॅडम यांनी केले.सौ.पूनम कोळंबे मॅडम यांनी मुलांना जागतिक महिला दिना विषयी माहिती सांगितली.व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ.वैशाली अडकमोल मॅडम यांनी केले.अशाप्रकारे जागतिक महिला दिन हा कार्यक्रम मोठ्या उत्साह साजरा करण्यात आला.



टिप्पणी पोस्ट करा