यावल दि.७
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि.१८ फेब्रुवारी २०२५ च्या शासन निर्णयानुसार,गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर तालुक्यातील बामनोद मंडळात शनिवार दि. ७ मार्च २०२६ रोजी आमोदे येथे संपन्न झाले.
या शिबीराचे उद्घाटन विजय ढगे साहेब उपजिल्हाधिकारी महसूल जळगाव, तहसीलदार यावल श्रीमती मोहनमाला नाझिरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी तहसीलदार यावल विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी,विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ - पुरवठा शाखा – १४२ नवीन / दुबार शिधापत्रिका संगायो शाखा – ३२७ लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, ९९ हयात प्रमाणपत्रे, १२ नवीन अर्ज सेतु शाखा – २४२ उत्पन्न, ७१ राष्ट्रीयत्व,६९ रहिवासी, २६ जातीचे दाखले वाटप, २१ आधार नोंदणी, ५५ यासुधारणा
पंचायत समिती – २ जलतारा योजनेला प्रशासकीय मान्यता बालविकास विभाग – ६ लाभार्थ्यांना बेबी कीट वाटप तालुका आरोग्य विभाग- जननी सुरक्षा योजना- ८ लाभार्थीना लाभ वाटप प्रधानमंत्री
मातृ वंदना योजना- ४ लाभार्थीना लाभ वाटप
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना- ११ लाभार्थ्यांना लाभ संजय गांधी योजना- ४६ लाभार्थ्यांना लाभ
कृषी विभाग- फळबाग लागवड योजना- २ लाभार्थी
गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना- १ लाभार्थी.
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.
एकूण ५००–६०० नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली.विजय ढगे उपजिल्हाधिकारी , श्रीमती मोहनमाला नाझिरकर, तहसिलदार यावल यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.
दिपक गवई, मंडळ अधिकारी बामणोद यांनी सूत्रसंचालन केले व अतुल गांगुर्डे नायब तहसीलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.



टिप्पणी पोस्ट करा