यावल दि.१३
शहरात नगरपरिषद कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर यावल - चोपडा तथा बऱ्हाणपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर बेकायदा सुरू असलेल्या कत्तलखान्यातून २१ हजार रुपये किमतीचे एक १०५ किलो वजनाचे कच्चे 'गोमास' आज सकाळी यावल पोलिसांनी हस्तगत करून कारवाई केली.कारवाई करण्यासाठी पोलीस येत असल्याचे बघून यातील अवैध गोमास विक्री करणारे ४ ही आरोपी फरार झाले असले तरी याबाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आल्याने गोमास विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,पो.कॉ.अनिल रमेश साळुंखे यावल यांनी फिर्याद दिली की यावल येथे यावल चोपडा तथा बऱ्हाणपूर अंकलेश्वर रोडवर
आज दि.१३ फेब्रुवारी २०२६ रोजी स.फौ. विजय धनंजय पाचपोळे,संदिप विठ्ठल सूर्यवंशी, पो.कॉ.
जाकीर नजीर तडवी असे यावल पोलीस स्टेशनला हजर असतांना स.पो.नि.अजयकुमार वाढवे यांनी त्यांचे दालनात बोलावुन कळविले की आताच मला गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की,यावल शहरात यावल चोपडा रोडचे बाजुस ख्वाजा मशीदीजवळ नगरपालीकेचे बंद पडलेल्या जुन्या कत्तलखान्या जवळ काही लोक हे गो-मांसची बेकायदेशीरपणे विक्री करीत आहेत,आपण तात्काळ सदर ठिकाणी पोहचल्यास कारवाई करता येईल अशी माहीती मिळाली माझे सोबत चला असा आदेश केला स.फौ.विजय पाचपोळे यांनी दोन पंचाना पोलीस स्टेशनला बोलावुन सदर गोपनीय बातमी मधील हकीकत समजावुन सांगीतली व पंच म्हणुन हजर राहण्यास सांगितले तसेच सफौ.
विजय धनंजय पाचपोळे,पोहेकॉ संदिप विठ्ठल सुर्यवंशी,पो.कॉ. जाकीर नजीर तडवी असे पोलीस
पोलीस स्टॉफ व पंच असे खाजगी मोटारसायकलवरुन गोपनीय बातमी, माहीतीनुसार आम्ही यावल शहरातील ख्वाजा मशिदीचे बाजुला असलेल्या यावल नगर पालीकेचे जुन्या कत्तलखान्याचे जवळ येवून सकाळी 07.45 वा. च्या सुमारास पंचासमक्ष पाहणी केली असता सदर ठिकाणी काही इसम हे दुकान लावून त्याचे समोर मांस तोडण्याचा लाकडी कुंदा व लोखंडी सुरा,
वजनकाटे तसेच मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे कच्चे मांसाचे मोठ-मोठे तुकडे तोडत असतांना दिसून आले.त्यांनी आम्हा पोलीसांना दुरुनच पाहीले असता ते मांस विक्री करणारे ४ ही दुकानदार हे ते विक्री करीत असलेले गोमांस व मांस कापण्याचे
सुरे,वजन काटे,वजन मापे असे साहीत्य जागीच सोडून आमचे विरुध्द दिशेला पळुन गेले.आम्ही
पोलीसांनी त्यांचा पाठलाग केला असता मांसविक्रेते इसम हे गल्ली बोळाचा फायदा घेवुन लांब अंतरावर पळुन गेले.ते मिळुन आले नाही.आम्ही घटनास्थळी बारकाईने पाहणी केली असता ४ ठिकाणी जवळ जवळ लाकडी टेबल ठेवून ते कच्चे को मास ठेवलेले आढळून आले.
पुढील चारही आरोपींकडून जागेवरून,ठिकाणाहून अनुक्रमे मिळून आलेल्या प्रत्येक दुकानावरील मांस हे
गोमोस असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असुन ते दोन पंचासमक्ष सदर ठिकाणी उपलब्ध असलेल्या तराजु काट्यामध्ये मोजुन पाहीले असता सदर ठिकाणी मिळुन आलेल्या मांसाचे वजन व वर्णन व इतर साहीत्याचे वर्णन खालील प्रमाणे
1) रु.7000/- पहिल्या दुकानावर मिळुन आलेले कचे मांस, लाल रंगाचे, कुबट / उग्र वासाचे एकुण वजन 35 किलो वजनाचे, व एक लोखंडी धारदार सुरा, तराजु वजन काटा मापांसह जु.वा. किं. अं
2) रु.4000/- दुसऱ्या दुकानावर मिळुन आलेले कच्चे मांस, लाल रंगाचे, कुबट / उग्र वासाचे एकुण वजन 20 किलो वजनाचे, व एक लोखंडी धारदार सुरा, तराजु वजन काटा मापांसह जु.वा. किं.अं
3) रु.5000/- तीसऱ्या दुकानावर मिळुन आलेले कच्चे मांस, लाल रंगाचे, कुबट / उग्र वासाचे एकुण वजन 25 किलो वजनाचे, व एक लोखंडी धारदार सुरा, तराजु वजन काटा मापांसह जु.वा. किं. अं 4) रु.5000/- चवथ्या दुकानावर मिळुन आलेले कच्चे मांस, लाल रंगाचे, कुबट / उग्र वासाचे एकुण वजन 25 किलो वजनाचे, व एक लोखंडी धारदार सुरा, तराजु वजन काटा मापांसह जु. वा. किं.अं. असे एकूण 21 हजार रुपये किमतीचे 105 किलोग्रॅम कच्चे गोमास आढळून आल्याने यावल पोलीस स्टेशनला महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ ( २०१५ सुधारणांसह ) कलम ६ मधील तरतुदीचे उल्लंघन केलेले असल्याने चारही आरोपी विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम ६ , ९ - अ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे करीत आहे.



टिप्पणी पोस्ट करा