यावल दि.१६
यावल - रावेर विधानसभा क्षेत्राचे कर्तव्यदक्ष आमदा अमोलदादा जावळे यांच्या प्रयत्नातून शासकीय योजनांच्या तृटी संदर्भात यावल शहरात ठीक ठिकाणी मोफत कॅम्प घेण्यात येत आहे.
सदर कॅम्प मध्ये ई श्रम कार्ड,नवीन मतदान कार्ड दुरुस्ती करणे,रेशन कार्ड दुरुस्ती आणि शेतकरी ओळख पत्र आयडी अशा प्रकारच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. आज सोमवार रोजी सदर कॅम्प यावल येथील प्रभाग क्र.१०,देशमुखवाडा येथे घेण्यात करण्यात आला. आमदार अमोलदादा जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्पचे आयोजन यावल नगरपालिका भारतीय जनता पार्टीच्या गटनेत्या सौ.नंदाताई महाजन,नगरसेवक योगेश चौधरी यांनी केले होते. तरी कॅम्प येथे उपस्थित नरेंद्रजी महाराज,नगरसेवक हेमराज फेगडे रोशन येवले,मुकेश कोळी,चेतन अढळकर,अमोल देशमुख,दीपक चौधरी,अतुल चौधरी,योगेश देशमुख (बापू), जितू कोलते,पराग देशमुख,रितेश बारी,उज्वल कानडे, इत्यादी प्रभागातील नागरिकांसह सदस्य उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा