श्री तारकेशवर महादेव मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी.

यावल दि.१६ 
यावल येथील हडकाई - खडकाई तथा हरिता- सरिता नदीच्या संगमावर पुरातन श्री.तारकेशवर महादेव मंदिर असून तेथे रविवारी महाशिवरात्रीनिमित्त भल्या पहाटेपासुन भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली.
सकाळी ५ वाजता थंड वातावरणात होणाऱ्या आरतीसाठी मंदिरात बहुसंख्येने भाविक उपस्थित होते.मंदिराचा परिसर स्वच्छ करून सुशोभित करण्यात आला होता.मंदिरावर तसेच समोरील परिसरात विद्युत रोषणाई करण्यात येऊन पटांगणात भव्य रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.त्यामुळे 
संपूर्ण परिसर ऊजळुन निघाला होता.सकाळच्या प्रसन्न वातावरणात दोन जोडप्याकडून महाकाल श्री.तारकेशवर महादेवाची आरती म्हणत श्रध्देने पुजा करण्यात आली. प्रथम श्रीगणेशाची आरतीनंतर महाकाल श्री.तारकेशवर महादेवाची आरती करण्यात येऊन मंत्र पुष्पांजली म्हणत जयजयकार करण्यात आला.यावेळेस भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन टाळ्यांच्या गजरात साथ दिली.त्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळेस भाविकांनी आंत गाभाऱ्यात जाऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन बाहेर पडत भोलेनाथाचा जयघोष केला.
भक्तांसाठी प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी,राजगिरा लाडु,केळी इ.पदार्थाचे वाटप कार्यकर्त्यांचे हस्ते करण्यात आले.मंदिराच्या सभागृहात श्री.तारकेशवर भजनी मंडळा तर्फे विविध भजने सुरेल व खडया आवाजात म्हणण्यात आली. वातावरण भक्तिमय झाले.यावेळेस भाविक मोठ्या संख्येत उपस्थित राहुन साथ देत होते.भजनाचा कार्यक्रम दिवसभर तसेच रात्रभर सुरू होता.त्याच प्रमाणे प्रसाद वाटप संध्याकाळपर्यंत करण्यात आले.संपुर्ण रात्रभर महादेवाच्या पिंडीवर सहा जणांनी पत्नीसह पुरोहितांनी म्हटलेल्या मंत्रोच्चारात दुधाचा अभिषेक केला.दि.१६ च्या सकाळ पर्यंत अभिषेक करण्यात आला.संपुर्ण रात्रभर भाविक उपस्थित होते.महिला भाविक मोठया संख्येत उपस्थित होत्या.अभिषेक आटोपल्यावर अभिषेक केलेल्या दुधाचे सर्व भाविक भक्तांना वाटप करण्यात आले.सदर अभिषेकचा कार्यक्रम यावल तसेच परिसरातील ब्रह्मवृंदांनी पार पाडण्यासाठी सहकार्य केले.सकाळी नेहेमीप्रमाणे नित्याची आरती करण्यात आली.शहरातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुणांनी विषेश सहकार्य केले.सदर कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी श्री विकास गुरव पुजारी,सोमा महाराज, प्रकाश सुर्यवंशी,विशाल भिल्,दिनेश बडगुजर,मोतीराम बाबा,बालाजी मोरे,गोलू चौधरी, शांताराम चौधरी,
पवन पाटील,नालेदादा इ.नी बऱ्याच परिश्रम घेतले.आरती मंडळातर्फे ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात