दीपनगर औष्णिक वीज केंद्रात, ६६० मेगावॅट मधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी. सामाजिक कार्यकर्ता - नितीन ब्राह्मणे

यावल दि.२६ 
भुसावळ तालुक्यातील दिपनगर औष्णिक वीज केंद्रातील ६६० मेगावॅट मधील स्फोटाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी भुसावळ येथील सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश ब्राह्मणे यांनी संबंधितांकडे लेखी केली आहे.

महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री, जिल्हाधिकारी जळगाव,दीपनगरचे महानिर्मिती मुख्य अभियंता यांच्याकडे दि.,२६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की,
मागील ६-७ दिवसांपूर्वी दीपनगर येथील नवीन ६६० मेगावॅट प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली आहे.हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाचा असून या प्रकल्पावर जनतेचा हजारो कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे.
प्राप्त माहीतीनूसार हा संच कार्यान्वित झाल्यापासून वारंवार तांत्रिक बिघाड होत असून निकृष्ट दर्जाच्या साहीत्याचा,वापर झाल्याचा दाट संशय आहे.
यापूर्वीही बॉयलर टयूब आणि इतर यंत्र सामग्रीमध्ये बिघाड झाल्याचा घटना घडल्या आहेत.
या स्फोटामुळे प्रकल्पाच्या यंत्र सामग्रीचे मोठे आर्थीक नूकसान झाले असून कामावार असलेल्या कामगारांच्या जिवांचाही मोठा निर्माण झाला आहे.ही घटना निव्वळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकिय निष्काळजीपणा
आणि भ्रष्टचाराचा परिणाम असू शकतो.
माझी मागणी आहे कि,सदर स्फोटामध्ये जखमी कामगारांना शासनाकडून त्वरीत १० लाखाची
मदत करुन दयावी.सदर स्फोटाची त्रयस्थ तांत्रिक समिती मार्फत तातडीने उच्चस्तरीय चौकशी
करण्यात यावी.या घटनेला जबाबदार असलेले अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार
कंपनीवर त्वरीत दंडात्मक आणि कायदेशीर कार्यवाही करावी.
सदर प्रकल्पाचे मागील ६ महीन्यांचे सेफ्टी ऑडिट आणि मेंटेनन्स रिपोर्ट सार्वजनिक करण्यात यावेत.जर माझ्या मागण्या व या घटनेची १५ दिवसांच्या आत निष्पक्ष
चौकशी सुरु झाली नाही,तर लोकशाही मार्गाने तीव्रस्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी असे दिलेल्या निवेदनात सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता नितीन सुरेश ब्राह्मणे यांनी नमूद केले आहे तरी संबंधित अधिकारी काय दखल घेत कार्यवाही करतात किंवा नाही.? याकडे आता तक्रारदार यांचे लक्ष लागून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात