यावल दि.९
यावल नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार मिळत नसल्याने मंगळवार दि.१० फेब्रुवारी २०२६ पासून नगरपरिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू होत आहे.
यावल नगर परिषदेच्या एकूण एकूण ५५ ते ६० साफसफाई करणाऱ्या स्री - पुरुष कर्मचाऱ्यांनी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ४ ते ५ वर्षापासून यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात साफसफाईचे स्वच्छता करण्याचे काम करीत आहोत.साफसफाई चा ठेका पुणे येथील दिशा कंपनीला देण्यात आला आहे ही कंपनी तथा मालक आम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनानुसार पगार देत नाही या संदर्भात आम्ही त्यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून खोटे आश्वासन व उडवा उडवीचे उत्तरे दिले जातात. आज पर्यंत दिशा कंपनीने आमच्या समस्या जाणून घेतलेल्या नाहीत शासनाच्या नियमानुसार व परिपत्रकानुसार किमान वेतन व महिन्याच्या ४ सुट्ट्या तसेच कामावर लागणारे साधन,साहित्य वेळेवर पुरविले नाही.ठेकेदार हा कामावरील कोणत्याही वाहनाचे दुरुस्तीचे कामे करीत नाही. आम्हाला आरोग्य विषयी काही महत्त्वाचे काम पडल्यास ठेकेदार कोणताही ॲडव्हान्स रक्कम देत नाही आणि दिल्यास ती रक्कम तात्काळ पगारातून कापली जाते. दर महिन्याचे वेतन वेळेवर मिळत नसून २० ते २५ दिवस उशिराने पगार दिला जातो. गेल्या वर्षी कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली आहे.परंतु आज पावतो आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. ठेकेदाराकडून कामावरून काढण्याची धमकी दिली जाते.त्यामुळे किमान वेतन नुसार पगार मिळणेसाठी,
महिन्याच्या ४ सूट्या कामगारांना मिळण्यासाठी,पीएफची रक्कम किमान वेतनानुसार टाकण्यात यावी यासाठी,कामावर लागणारे संपूर्ण साहित्य मिळण्यासाठी, कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यासाठी, ठेकेदाराच्या सुपरवायझर कडून कर्मचाऱ्यांना नाहक त्रास दिला जातो तो बंद होण्यासाठी. दर महिन्याला नियमित वेतन मिळण्यासाठी मंगळवार दि.१० पासून बेमुदत उपोषण करीत आहे.असे दिलेल्या निवेदनात नगरपरिषद कर्मचारी संघटना अध्यक्ष जितेंद्र पारधी उपाध्यक्ष नितीन पाटील यांच्यासह ५५ ते ६० कर्मचाऱ्यांनी आपली स्वाक्षरी करून नमूद केले आहे.
यावल नगरपरिषद मुख्याधिकारी काय कारवाई करतात.? याकडे आता सफाई कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे.



टिप्पणी पोस्ट करा