साने गुरुजी विद्यालय परीक्षा केंद्रावर पोलीस,होमगार्ड, सीसीटीव्ही कॅमेरे निगराणीत परीक्षा सुरू.


यावल दि.१३
बोर्डाच्या परीक्षेत कॉपी आढळल्यास संस्था चालकांवर गुन्हा दाखल होणार अशा सूचना वजा आदेश शिक्षण विभागाने दिल्याने येथील नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात दि.१० पासून १२ वी परीक्षा पोलीस होमगार्ड यांच्या कडक बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या निगराणीत सुरू असल्याने कॉपी करण्यास मोठा प्रतिबंध झाला असल्याचे परीक्षार्थी यांच्या सह पालकांमध्ये चर्चा आहे. 

गेल्या दहा पंधरा वर्षापासून परीक्षा केंद्रांत सीसीटीव्ही कॅमेरे अभावी अनेक परीक्षा केंद्रांवर काही प्रमाणात कॉपी सुरू होती परंतु सुरू शैक्षणिक वर्षापासून शिक्षण विभागाने बोर्डाच्या परीक्षेत कॉपी आढळल्यास संस्था चालकांवर गुन्हा दाखल केला जाणार असे जाहीर आदेश काढल्याने तसेच परीक्षा केंद्राच्या आजूबाजूला आणि परीक्षा सुरू असताना ब्लॉक मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे केल्याने परीक्षार्थींना कॉपी करण्यास मोठा प्रतिबंध झाला असल्याने अनेक परीक्षा केंद्राबाहेर कॉपी पुरवणाऱ्यांची गर्दी सुद्धा कमी होत असल्याने बंदोबस्तावरील होमगार्ड पोलीस यांचा बंदोबस्ताचा ताण सुद्धा काही प्रमाणात  कमी झाल्याने आणि कॉपीला आळा बसल्याची चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात