यावल दि.९ आषाढ महिन्यात संत मुक्ताबाईच्या स्मरणार्थ निघणारी वारी म्हणजे मुक्ताईवारी आहे. मुक्ताईवारीला महाराष्ट्रात खूप मोठे धार्मिक,सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व आहे या शुद्ध उद्देशाने आणि परंपरा कायम ठेवीत यावल येथील ठाकूर प्रेम मेकर शब्बीर मुसा पटेल यांनी मुख्य उद्देश समोर ठेवून भक्ती, करुणा आणि समतेचा संदेश देत गेल्या २० पंचवीस वर्षापासून मामलदा येथून भगवान महाराज यांच्यासह ३० ते ४० स्री-पुरुषाच्या संयुक्त निघणाऱ्या मुक्ताई वारीचे यावल येथील वाणी गल्लीतील कोहळेश्वर राम मंदिरात भव्य स्वागत करून त्यांच्यासोबत महाप्रसादाचा ( स्नेहभोजनाचा ) लाभ घेत वारकरी स्त्री पुरुषांची सेवा केली.
मुक्ताईवारीचे धार्मिक महत्त्व म्हणजे संत मुक्ताबाई या संत ज्ञानेश्वराच्या धाकट्या भगिनी होत्या आणि आहेत,त्यांनी भक्ती, करूणा आणि समतेचा संदेश सर्व जाती-धर्माला दिला आहे.मुक्ताई वारीत चालताना वारकरी नामस्मरण,अभंग हरिपाठ करतात. वारी म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याचा साधन मार्ग मानला जातो.
सामाजिक महत्त्व- वारीत जात- धर्म- श्रीमंतीचा भेद राहत नाही सर्वजण माऊली म्हणून एकमेकांना संबोधतात सेवा, स्वच्छता,शिस्त,संयम याचे उत्तम दर्शन वारीतून घडत असते गावोगावी लोक वारकऱ्यांची निस्वार्थ सेवा करतात या शुद्ध भावनेने आणि प्रेरणेने गेल्या २० वर्षापासून यावल येथील ठाकूर फ्रेम मेकरचे संचालक शब्बीर मुसा पटेल हे स्वतः वारकऱ्यांची सेवा अखंडितपणे करीत आले आहेत. त्यांनी काल रविवार दि.८ फेब्रुवारी २०२६ रोजी संध्याकाळी ७ वाजता यावल येथील श्री कोहळेश्वर राम मंदिरात भव्य स्वागत करून त्यांना महाप्रसादाचे वाटप करून त्यांची सेवा केली यावेळी प्रभागातील अनेक मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा