यावल - भुसावळ, अट्रावल मुंजोबा रस्त्याची दयनिय अवस्था, बऱ्हाणपूर - अंकलेश्वर राष्ट्रीय मार्गासह, आमोदा- बामनोद रस्त्यावर बेसुमार वृक्षतोड.


यावल दि.६ 
यावल भुसावळ ५ किलोमीटर रस्त्याची निकृष्ट दर्जाची डाग- डुजी गेल्या १५ दिवसांपूर्वी करण्यात आली.परंतु अंजाळे गावाजवळ शनी मंदिराजवळ खड्ड्यात रस्ता झाला तिथून एक ते दीड किलोमीटर अंतरावरील डाग- डुजी संबंधित ठेकेदारांनी न केल्याने वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे आमोदा - बामनोद रस्त्याच्या आजू- बाजूने गरज नसताना वृक्षतोड होत आहे. बऱ्हाणपूर - अंकलेश्वर रस्त्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अनावश्यक वृक्षतोड झाल्याने तसेच अट्रावल मुंजोबा रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने तालुक्यात बांधकाम विभाग,वन विभाग,महसूल विभाग,लोकप्रतिनिधी बाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 
सविस्तर माहिती अशी की यावल भुसावळ रस्त्यावर यावल पासून एक किलोमीटर अंतराचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात आला तसेच राजोरा फाट्यापासून अंजाळे गावाकडे जाणारा एक ते दोन किलोमीटरचा रस्ता सुद्धा सिमेंट काँक्रीटच्या करण्यात आला एक दीड वर्षाच्या आतच या या रस्त्यावर सरळ लांब रेषेत रस्त्याच्या मधोमध मोटरसायकलचे चाक अटकेल अशा खोल जागोजागी "दऱ्या" निर्माण झाल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर थातूरमातूर असे डांबर ओतले तरी मोटरसायकली घसरून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.हा रस्ता तयार करताना सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी झोपले होते का.? ठेकेदाराने निकृष्ट प्रतीचे काम का केले..? त्याच्यावर कारवाई काय केली.? आणि आता रस्त्याच्या आजूबाजूने गेल्या पंधरा-वीस दिवसापासून डाग- डुजी साठी बांधकाम साहित्य आणून पडले परंतु ठेकेदार रस्त्याची डाग- डुजी केव्हा करणार..? डाग- डुजी बाबत संबंधित अधिकारी ठेकेदार हे जाणून-बुजून दुर्लक्ष करीत आहे का..,? तालुक्यातील लोकप्रतिनिधींना हा खराब झालेला रस्ता दिसत नाही का.? असा प्रश्न उपस्थित केला जात असून राजकारण हे फक्त सोयीनुसार,
आर्थिक बळावर,गुंडगिरीवर,दहशितीवर अवलंबून आहे का..? असा प्रश्न जनतेमध्ये उपस्थित केला जात आहे.

आमोदा- बामनोद रस्ता ३० मीटर रुंदीचा सिमेंट काँक्रीट मधे बांधकाम होत आहे.असे असताना रोडच्या सेंटर पासून १५ मीटर अंतरातील वृक्षतोड करणे क्रमप्राप्त असताना संबंधित वृक्षतोड करणारे वन विभाग,बांधकाम विभाग आणि महसूल विभागाला आपल्या खिशात ठेवून १५ पंधरा मीटर पेक्षा जास्त अंतरावरील वृक्षतोड करून आपले ' उखळ' पांढरे करून घेत आहे याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने अधिकारी या वृक्षतोड प्रकरणात अर्थपूर्ण हितसंबंध जोपासत आहेत का.? अशी सर्व स्तरात चर्चा आहे. 

याचप्रमाणे बऱ्हाणपूर अंकलेश्वर रस्त्यावर बेसुमार झालेल्या वृक्षतोडीची चौकशी केव्हा आणि कोण करणार..? याबाबत सुद्धा यावल तालुक्यात जोरदार चर्चा आहे. इत्यादी महत्त्वाच्या विषयाकडे तसेच यावल भुसावळ रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभाग,लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

अट्रावलचा मुंजोबा आणि अंजाळे येथील शनि महाराज जि.प.पं.स. निवडणुकीत निष्क्रियतेला मोठा फटका देणार.......

सोमवार दि.१९ जानेवारी २०२६ पासून संपूर्ण खानदेशातील श्रद्धास्थान असलेले अट्रावल येथील मुंजोबाची यात्रा दर सोमवारी आणि शनिवारी सुरू होत आहे.चितोडा अट्रावल आणि या अट्रावल 
मुंजोबा भालोद हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.या रस्त्यावरूनधुळे,अमळनेर,शिरपूर,चोपडा,
जळगाव,ममुराबाद,विदगाव, डांभुर्णी, किनगाव,
यावल मार्गे हजारो भाविक मिळेल त्या वाहनांनी येत असतात.तर धुळे ,जळगाव, नशिराबाद, भुसावळ, जामनेर, कुऱ्हा,तसेच मुक्ताईनगर,वरणगाव फॅक्टरी,
फुलगाव, दीपनगर, इत्यादी परिसरातील हजारो भाविक भुसावळ यावल रस्त्याने अंजाळे गावाहून शनि महाराजांचे दर्शन घेत राजोरा मार्गे अट्रावल येथे मुंजोबाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने भाविकांचे मोठ्या प्रमाणात हाल पडणार आहेत आणि भाविकांना त्रास सहन करावा लागणार असल्याने अट्रावल येथील 'मुंजोबा' आणि अंजाळे येथील शनि महाराज निष्क्रिय अशा काही भावी उमेदवारांना जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत ग्रामस्थांच्या मतदानाच्या माध्यमातून चांगलाच फटका देतील अशी भाविकांमध्ये चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात