नगरसेवक तथा पूर्वाश्रमीचे पत्रकार पराग सराफ यांनी आपल्या प्रभागातील समस्या न.पा.कडे लेखी स्वरूपात मांडल्या.


यावल दि.६ ( सुरेश पाटील )
आज दि.६ जानेवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून,विद्यमान नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवक तथा पूर्वाश्रमीचे पत्रकार पराग विजय सराफ यांनी आपल्या प्रभागातील विविध समस्येबाबत नगरपालिकेला लेखी निवेदन देऊन नगरपरिषद सदस्य म्हणून प्रत्यक्ष आपल्या कामकाजाला सुरुवात केली. 

यावल नगरपालिका ओ.एस. विशाल काळे व संग्राम शेळके तसेच कामील शेख ह्यांच्याकडे नगरसेवक पराग सराफ यांनी आपल्या प्रभाग ७ ब मधील नागरिकांच्या प्राथमिक समस्याचे तात्काळ निराकरण होण्यासाठी लेखी निवेदन दिले यावेळी त्यांच्यासोबत प्रभागातील सारंग बेहडे,मयूर खर्चे,हर्षल कोळी, इत्यादी तरुण पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.सदर काम ताबडतोब मार्गे लावण्यात येईल असे आश्वासन विशाल काळे यांनी नगरसेवक पराग सराफ दिले.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात