यशोदाआईच्या वृद्धाश्रमात अनेक जण वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करून स्नेहभोजन करतात.

यावल दि.२४
येथील भुसावल रोडवरील बालाजी सिटीत असलेल्या यशोदाआई फाउंडेशन वृद्धाश्रमात ६० वयापेक्षा जास्त असलेल्या वयोवृद्ध स्त्री - पुरुष वृद्धांसोबत वाढदिवस साजरा करून स्नेहभोजनाचा आनंद घेण्याकडे अनेकांचा सकारात्मक दृष्टिकोन / कल यावल शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये दिसून येत आहे.

वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात वृद्ध स्त्री-पुरुषांची सेवा करण्याच्या उद्देशाने यावल येथील करन राज चौधरी या अल्पवयीन विद्यार्थ्यांने आपल्या परिवारासह गुरुवार दि.२२ जानेवारी २०२६ रोजी यावल येथील भुसावल रोडवर असलेल्या बालाजी सिटीतील यशोदाआई फाउंडेशन वृद्धाश्रमात वयोवृद्ध स्री- पुरुषांचे आशीर्वाद घेत त्यांच्यासोबत स्नेहभोजन करून मोठ्या आनंदात वाढदिवस साजरा केला.

करन राज चौधरी या अल्पवयीन विद्यार्थ्यांने समाजसेवेचा ध्यास घेत वृद्धाश्रम "सेवा" हे ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यातील एकाकीपण दूर करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी निवारा, आरोग्य,आणि भावनिक आधार देणारे महत्त्वपूर्ण कर्तव्य आहे। सेवाभावी वृत्तीने त्यांच्या जेवणापासून,
औषधोपचारांपर्यंत व मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मनोरंजनात्मक क्रियाकलाप पुरवणे,ही वृद्धाश्रमाची प्रमुख जबाबदारी आहे । हे कार्य वृद्धांना सुरक्षितता आणि आनंदी वातावरण प्रदान करते । 
वृद्धाश्रमातील सेवा आणि कर्तव्यांचे प्रमुख पैलू:
मूलभूत गरजा पूर्ण करणे: ज्येष्ठ नागरिकांना राहण्यासाठी स्वच्छ निवारा,सकस भोजन,आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे.आरोग्यसेवा: नियमीत वैद्यकीय तपासणी,डॉक्टरांची उपलब्धता आणि मोफत औषधोपचार पुरवणे। भावनिक आधार: वृद्धांशी प्रेमाने संवाद साधणे,त्यांचे ऐकून घेणे आणि त्यांना एकटेपणा जाणवू न देणे.
मनोरंजन: मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी इनडोअर गेम्स, बागकाम,गायन आणि भजन यांसारख्या क्रियाकलाप आयोजित करणे।कायदेशीर जबाबदारी: महाराष्ट्र शासनाच्या नियमांनुसार ६० वर्षे वय असलेले पुरुष व ५५ वर्षे वय असलेल्या स्त्रियांना सन्मानाने प्रवेश दिलेला असल्याने सुविधा पुरवणे, जे 'माता-पिता व ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण कायदा, २००७' अंतर्गत येते।
सेवाभावी दृष्टीकोन: वृद्धाश्रम हे फक्त निवारा नसून ते 'साधनाश्रम' किंवा 'मोक्षमंदिरे' म्हणून चालवणे, जिथे वृद्धांना शांतता मिळेल हा यशोदाआई फाउंडेशनचा दृष्टिकोन लक्षात घेऊन त्याने आपला वाढदिवस यशोदाआई वृद्धाश्रमात साजरा केला.
थोडक्यात, वृद्धाश्रम सेवा हे ज्येष्ठ नागरिकांच्या उर्वरित आयुष्याला आनंदी आणि अर्थपूर्ण बनवण्याचे कर्तव्य आहे.

यशोदाआई फाउंडेशन विनाअनुदानित वृद्धाश्रमात वयोवृद्ध स्री - पुरुषांना ज्यांना मदत करायची असेल किंवा वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घ्यायचा असेल त्यांनी अध्यक्ष: पंकज बारी (मोबा.नं.९७५७४३५६०७ ),उपाध्यक्ष : नरेंद्र पाटील, सचिव : विजय सावकारे
(९५९५९१ ०३८९),सभासद पवन पाटील,सभासद राहुल कोळी, सभासद सुनिता रोझोदकर सभासद : अनिता बाविस्कर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात