सार्वजनिक नळ कनेक्शन वरून अवैध नळ कनेक्शन. बारीवाड्यातील भारी प्रकरणाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष.

यावल दि.३०
सार्वजनिक नळ कनेक्शन असलेल्या पाईप लाईन वरून अवैध खाजगी नळ कनेक्शन घेतल्याची तक्रार दाखल झाल्याने शहरातील बारीवाड्यातील गैरप्रकाराचा भारी प्रकार उघडकीस आला असल्याने याकडे यावल नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल शहरातून / तक्रारदाराने केला आहे.

दि.२१ जानेवारी २०२६ रोजी यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे बारीवाड्यातील स्वप्निल रमेश बारी यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे की घराजवळील सरकारी नळ कनेक्शन वरून ( स्टँडपोजवरून सार्वजनिकरित्या पाणी पुरवठा होण्यासाठी नगरपालिकेचे असलेले नळ कनेक्शन ) काहींनी खाजगी अवैधरित्या नळ कनेक्शन जोडणी करून घेतली आहे त्यामुळे खाजगी अधिकृत नळ कनेक्शन धारकांना कमी दाबाने, कमी प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याने रोज आप- आपसात भांडणे तंटे होतात त्यामुळे अवैध नळ कनेक्शनची चौकशी करून तात्काळ बंद करण्याची मागणी वाज लेखी तक्रार स्वप्निल बारी यांनी केली असली तरी यावल नगर परिषद पाणीपुरवठा विभागाने अद्याप कार्यवाही न करता कनेक्शन बंद न केल्याने ते अवैद्य कनेक्शन बंद होणार किंवा नाही याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष लागून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात