जंक्शन शहरातील अवैध धंदे,मद्यविक्रीचे अड्डे बंद करण्याकरता तक्रारदारांनी उपोषण न करता पोलिसांना सहकार्य करावे. भुसावळच्या दोघं पोलीस निरीक्षकांनी तक्रारदारांना लेखी पत्र दिले.


यावल दि.२९
भुसावळ नगर परिषदेच्या व्यापारी संकुलनात व शहर पोलिस, व बाजारपेठ पोलिस हद्दीत अतिक्रमित जागा वरील सट्टा,पत्ता व अवैध मद्य विक्रीचे अड्डे तातडीने काढून टाकणे बाबत राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.) शहराध्यक्ष हाजी अशरफ खान हसन खान, तालुकाध्यक्ष जयंत मोहन लोणारी यांनी २३ जानेवारी २०२६ लेखी तक्रार केली असता भुसावल बाजार पेठ पोलीस स्टेशन आणि भुसावल शहर पोलीस स्टेशन मधील दोघं पोलीस निरीक्षकांनी तक्रारदारांना लेखी पत्र देऊन उपोषण न करता सहकार्य करण्याबाबत कळविल्याने भुसावळ शहरातील अवैध धंद्यांबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.

जिल्हाधिकारी जळगाव, उपविभागीय दंडाधिकारी भुसावळ,अशा विविध ठिकाणी तक्रारदारांनी दिलेल्या निवेदनाच्या संदर्भांनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ तसेच भुसावल शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक ( नाव नमूद न केलेले ) यांनी रविवार दि.२५ रोजी तक्रारदार यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की,
"भुसावळ नगर परीषदेच्या व्यापारी
संकुल व शहर हद्दीतील अतिक्रमित जांगावरील सट्टा,पत्ता व अवैध मद्यविक्रीचे अड्डे तातडीने काढून टाकणेबाबत तक्रार अर्ज" अशा आशयाचे व त्या कारणास्तव सोमवार दि.२६ जानेवारी २०२६ रोजी पर्यत अवैध धंदे बंद न झाल्यास प्रजासत्ताक दिना रोजी उपोषणास उप विभागीय अधिकारी कार्यालय,भुसावळ समोर उपोषणास बसण्याबाबत परवानगी निवेदन सादर केलेले आहे.तरी आपणास याव्दारे लेखी कळविण्यात येते की,भुसावळ बाजारपेठ पोस्टे हद्दीतील सर्व अवैध धंद्याच्या समुळपणे उच्चाटन करण्यात येत आहे.सट्टा,पत्ता व अवैध मद्यविक्रीचे अड्डे यांच्यावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच "भुसावळ नगर परीषदेच्या व्यापारी संकुल व शहर हद्दीतील अतिक्रमित जांगे संबंधी आपण न.पा.भुसावळ यांचे कडेस रितसर तक्रार दाखल करुन कायदेशीर दाद मागून घेवुन दि.२६ जानेवारी २०२६ रोजी भुसावळ शहरातील सार्वजनिक शांतता अबाधीत ठेवणे ठेवण्याकरीता उपोषणासारखा मार्गाचा अवलंबन न करता पोलीस विभागास अवैध धंद्याचे समुळपणे उच्चाटन
करण्याकरीता सहकार्य करावे. असे पत्र दिल्याने तूर्त उपोषण स्थगित करण्यात आले असले तरी भुसावळ शहरात सर्वत्र अवैध धंदे सुरू होते हे निष्पन्न झाले आहे. अवैध धंदे कायमस्वरूपी बंद होतील का.? आणि अवैध धंदे चालकांवर नाम मात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल केले असले तरी शहरातील अवैध धंदे चालक कायमस्वरूपी आपले अवैध धंदे बंद करतील किंवा नाही याकडे आता संपूर्ण भुसावळ शहराचे लक्ष वेधून आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात