यावल दि.२४
येथील बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीच्या ४८ व्या वर्धापन दिना निमीत क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे उद्घघाटन पी.एस.सोनवणे सर यांच्या हस्ते करण्यात आले.या प्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना जीवनातील खेळाचे महत्त्व पटवून दिले.
प्रमुख अतिथी म्हणून बाल संस्कार मंडळ एज्युकेशन सोसायटीचे माननीय अध्यक्ष महेश वाणी यावल नगरपरिषद शिक्षण समिती सभापती तथा नगरसेवक पराग सराफ हे होते.तसेच विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या खेळांमध्ये सहभाग नोंदवून आपली कौशल्य दाखविली.इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्यामध्ये अडथळा शर्यत,बुक बॅलेन्स,लिंबू चमचा,स्लो सायकलींग,दोरी वरील उड्या,गोळा फेक,लांब उडी, इत्यादी वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या. सर्व स्पर्धा बाल संस्कार विद्या मंदिराचे मुख्याध्यापक सुनील माळी सर यांच्या मार्गदर्शनाखाली पारपडल्या नंतर तब्बल ५० विद्यार्थ्यांना नवनिर्वाचित नगरसेवक तथा यावल नगर परिषद शिक्षण समिती सभापती पराग यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र व ट्रॉफी बक्षीस म्हणून वितरण करण्यात आले .
मान्यवरांनी विजयी झालेल्या विद्यार्थ्यांची व कार्यक्रमाची प्रशंसा केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती गायकवाड मॅडम, पाहुण्यांचा परिचय महाले सर, कार्यक्रमाची क्रीडा प्रतिज्ञा शिवशंकर सोळंकी सर, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रोहित भालेराव सर यांनी केले.सर्व कार्यक्रमाचे चित्रीकरण संजय चौधरी सर यांनी केले.कवायत परेड अतुल पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.कार्यक्रम पार पाडणेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.



टिप्पणी पोस्ट करा