मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट व्यक्तीने शेत खरेदी करून दिले. जालना येथील महिलेने फिर्याद दिल्याने यावल येथील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

यावल दि.२१
१ जानेवारी १९९५ रोजी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावाने दि. १६ जानेवारी २०२३ रोजी यावल येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यासमोर बनावट व्यक्तीने शेत खरेदी करून दिले अशी फिर्याद जालना येथील श्रीमती कांचन संजय खत्री वय ५० या महिलेने दिल्याने यावल पोलीस स्टेशनला यावल येथील पोलीस स्टेशनला अंबरनाथ येथील अजित तुळशीराम भंडारी याच्यासह यावल येथील १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

मंगळवार दि.२० जानेवारी २०२६ रोजी यावल पोलीस स्टेशनला श्रीमती कांचन खत्री यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की 
गेलाराम भुरोमल हे माझ्या वडिलांचे भाऊ होते ते जालना येथे राहत होते त्यांचे दि.१ जानेवारी १९९५ रोजी निधन झालेले आहे.
त्यांचा विवाह झालेला नसल्यामुळे त्यांना कोणतेही अपत्य नव्हते त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर मी व माझा पुतण्या राजकुमार टोपणदास मोरयानी हे कायदेशीर वारस आहेत,भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर भारत पाकिस्तान फाळणी नंतर माझे काका गेला राम भुरोमल हे पश्चिम पाकिस्तान मधून भारतात आल्यानंतर त्यांना यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील गट क्र.१९३ मधील एकूण ३ हेक्टर १९ आर क्षेत्रफळ शेतजमीन ही महाराष्ट्र शासनातर्फे दि.२७.५.१९८५ रोजी कायदेशीर रित्या लेखी पत्र देऊन बहाल करण्यात आली होती.

गेलाराम भुरोमल मयत असताना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अजित तुळशीराम मंडळी ४४ याने त्यास परिचित असलेला पालघर जिल्ह्यातील वसई येथील श्याम मनोहर मुदंडा ( मुंद्रा ) यांस बनावट गेलाराम भुरोमल नाव देऊन त्याचे नावाने बनावट आधार कार्ड, बनावट पॅन कार्ड बनवून यावल येथील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यासमोर जमीन खरेदीचे व्यवहारा करिता उभे करून लबाडीच्या इराद्याने यावल तालुक्यातील बोरावल खुर्द येथील गट नंबर १९३ मधील एकूण ३ हेक्टर १९ आर क्षेत्रफळाची शेतजमीन ही गेलाराम भुरोमल याचे मालकीची खरेदी खत करून स्वतःचे नावे हस्तांतरित केली.
मालकाबाबत कोणतीही खात्री न करता व माहीती न घेता अजित तुळशीराम भंडारी व शाम मनोहर मुंदडा यांनी तयार केलेले खरेदीखत हे बनावट असल्याची माहीती असतांना त्यांनी अजीत तुळशिराम भंडारी याचेशी संगनमत करुन सदर खरेदीखत हे खरे म्हणुन वापरुन त्या आधारे
शेतजमीन ही सकुबाई दशरथ धनगर हिने दि.५ /१२ / २०२२ रोजीचे खरेदीखतांद्वारे व उर्वरीत 1 हेक्टर ७४ आर जमीन ही प्रशांत पाटील याने दि. २/४/२०२५ रोजीचे खरेदीखतांद्वारे स्वतःचे नावावर खरेदी करुन
घेतली म्हणून अजीत तुळशिराम भंडारी, शाम मनोहर मुंदडा सकुबाई दशरथ धनगर यांच्यासह एकूण बारा जणांविरुद्ध यावर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.

त्रयस्थ बोनाफाईट परचेसरला आरोपी केल्याने चौकशी अधिकारी अडचणीत येणार..

सदरची शेतजमीन ही बनावट व्यक्ती उभी करून एक वेळा व्यवहार झाला,त्यानंतर त्या बनावट व्यक्तीशी काही एक संबंध नसताना तिसऱ्या व्यक्तीने खरेदी केल्याने त्रयस्थ बोनाफाईट / परचेसर खरेदी करणाऱ्याला आरोपी केल्याने या गुन्ह्याचा तपास करणारा अधिकारी अडचणीत येऊ शकतो अशी कायदा तज्ञ मंडळीत चर्चा आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात