नमो एनर्जीवर छापा टाकून ३० हजार लिटर ३६ लाख रुपयाचा ज्वलनशील डिझेल सदृश साठा जप्त केल्याची पोलिसांनी कौतुकास्पद कामगिरी. 'गुजरात' कनेक्शन झाले उघड ..

यावल दि.१९ 
भुसावळ तालुक्यातील किन्ही शिरपूर एमआयडीसी परिसरातील 'नमो एनर्जी ऑईल' कंपनीच्या गोदामात सुरू असलेल्या संशयास्पद इंधन साठवणुकीची गुप्त खबर भुसावळ तालुका पोलिस आणि पुरवठा विभागाला मिळाले पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून डिझेल सदृश्य ज्वलनशील ३० हजार लिटरचा साठा जप्त करण्याची कौतुकास्पद कामगिरी केली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की रविवारी दि.१८ जानेवारी रोजी दुपारी पोलीस प्रशासनाने टाकलेल्या धाड सत्रात तब्बल ३० हजार लिटर डिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाने भरलेला टँकर जप्त करण्यात आला असून, एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हा ज्वलनशील पदार्थ आढळून आला याचा थेट संपर्क गुजरात राज्याशी असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

 गुजरात कनेक्शन असलेल्या या कंपनीवर झालेल्या कारवाईमुळे जिल्ह्यातील भेसळखोर आणि ऑईल माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली असून कायदेशीर कारवाई बाबत संबंधित व्यापारी वर्तुळात धास्ती निर्माण झाले आहे.

भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि स्थानिक गुन्हे शाखेला किन्ही एमआयडीसी मधील प्लॉट नंबर F- 50 / 51 वरील 'नमो एनर्जी ऑईल' या कंपनीत संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली त्यानुसार.तेथे एक टँकर उभा असून त्यात डिझेलसारखा ज्वलनशील पदार्थ असल्याची खबर मिळताच पोलिसांची व पुरवठा यंत्रणा कामाला लागली. तहसीलदार यांच्या आदेशान्वये पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर,पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे आणि त्यांच्या पथकाने पंचासमक्ष रविवारी दुपारी ११:३० वाजेच्या सुमारास कंपनीच्या आवारात प्रवेश करित धाड टाकली.घटनास्थळी जी.जे. २४ - व्ही. ७६५५ (G) 24 V 7655) क्रमांकाचा टँकर उभा असल्याचे आढळून आले.पथकाने टँकरच्या कॉकमधून द्रव पदार्थ काढून पाहणी केली असता,त्याला डिझेलसारखा उग्र वास येत असल्याचे स्पष्ट झाले.यावेळी उपस्थित कंपनी मालकाचे भाऊ अमीन इक्बाल तेली ( रा.सुरत ) यांची चौकशी केली असता, उडवाउडवीची उत्तरे मिळाली.हा टँकर ट्रान्सपोर्टचा असून तो भाडे करारावर आणल्याचे सांगण्यात आले,मात्र चालक जागेवर नव्हता.अधिकाऱ्यांनी जागेवरच टँकरमधील इंधनाची घनता ( Density 712 ) आणि तापमान ( Temperature 20 ) मोजले. हा पदार्थ बायोडिझेल आहे की भेसळयुक्त डिझेल,याची खात्री करण्यासाठी नमुने सीलबंद करून प्रयोगशाळेत ( CA ) पाठवण्यात आले आहेत. या कारवाईत १५ लाख रुपये किमतीचा टँकर आणि २१ लाख रुपये किमतीचे ३० हजार लिटर इंधन ( ७० रुपये प्रति लिटर दराने ) असा एकूण ३६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.हा टँकर आता भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात सुरक्षिततेसाठी हलवण्यात आला आहे.

दरम्यान ही कारवाई पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर,पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे,शिर्डी उपनिरीक्षक रवी नरवडे हवालदार उमाकांत पाटील गोपाळ गव्हाणे रतन परदेशी विकास सातदिवे राहुल वानखेडे आणि तालुका पोलीस स्टेशनचे पथकाने केली.पंच म्हणून तलाठी मनीषा बरडिया आणि प्रमोद ठोसर उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात