शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत परत केला.



यावल दि.१७ 
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा व सर्व जिल्ह्यातर्फे महाराष्ट्रातील सर्व पोलीस अधिकारी,कर्मचारी व होमगार्ड यांच्या बंदोबस्तामुळे नगरपालिका व महानगरपालिका निवडणुका शांततेत पार पडल्या.परंतु शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी तीव्र निषेध व्यक्त करीत परत केला.

निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या महापालिकां निवडणुका बंदोबस्तात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना शासनातर्फे देण्यात आलेल्या देयक मान्य नाही म्हणून मिळालेल्या देयकाला शासनास देय भत्ता स्वाभिमानी पोलिसांनी नाकारला व परत केला.इतर डिपार्टमेंटच्या अधिकारी कर्मचारी व शिपाई यांना देण्यात येणाऱ्या देयक भत्ता व पोलीस अधिकारी कर्मचारी शिपाई यांना देण्यात आलेल्या देयक भत्त्या मध्ये मोठी तफावत आणि भेदभाव का त्यांनी पण सर्व निवडणूक बंदोबस्तामध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांन प्रमाणेच आपली जबाबदारी कर्तव्य बजावले आहे इतरांप्रमाणे पोलिसांनाही निवडणूक देय भत्ता देण्यात यावा ही शासनास मागणी आहे.
पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा अध्यक्ष भूषण नगरे सर उपाध्यक्ष हेमंत तावडे सर व पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पदाधिकारी यांची मागणी मान्य करावी अन्यथा सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा मार्फत अशाच प्रकारे निवडणूक आयोगाच्या विरोधात जाहीर निषेध केला जाईल.असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात पोलीस बॉईज असोशियनने म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Advertisement

 


 



जाहिरात